
सन 2006 साली कॉंग्रेसने महाराष्ट्रात कंत्राटी शेतीचा कायदा काढला. त्यानंतर महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, अदानी, अंबानीने किती जमिनी हटप केल्या सांगाव्यात. कॉंग्रेसने कायदा केला तर तो चांगला आणि मोदीजींनी त्याहून चांगला कायदा केला केला तर त्याविरोधात ट्रॅक्टर मोर्चाचा फार्स करायचा. त्या ट्रॅक्टर मोर्चात एकही शेतकरी नव्हता, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
इस्लामपूर (सांगली) ः सन 2006 साली कॉंग्रेसने महाराष्ट्रात कंत्राटी शेतीचा कायदा काढला. त्यानंतर महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, अदानी, अंबानीने किती जमिनी हटप केल्या सांगाव्यात. कॉंग्रेसने कायदा केला तर तो चांगला आणि मोदीजींनी त्याहून चांगला कायदा केला केला तर त्याविरोधात ट्रॅक्टर मोर्चाचा फार्स करायचा. त्या ट्रॅक्टर मोर्चात एकही शेतकरी नव्हता, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
रयत क्रांती संघटना आणि किसान मोर्चातर्फे आयोजित किसान आत्मनिर्भर यात्रेच्या सांगता समारंभात श्री. फडणवीस बोलत होते. कॉंग्रेसने सांगलीत कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी ट्रॅक्टर रॅली काढली होती. त्यावर फडणवीस यांनी टीका केली.
त्यांनी कॉंग्रेससह डाव्या पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, ""दिल्लीत डाव्या विचारांचे कम्युनिष्ट मोर्चा काढत आहेत. कृषी कायद्यामुळे बाजार समित्या मोडीत निघतील, असा आरोप करत आहेत. वास्तविक, त्यांचे राज्य असलेल्या केरळ राज्यात कुठे आहेत बाजार समित्या? किती टोकाचा विरोधाभास आहे हा? किती खोटे बोलायचे? ही दुटप्पी व दोगली भूमिका आहे.''
ते म्हणाले, ""मोदीजींनी शेतकऱ्यांना देशाची बाजारपेठे खुली करून दिली आहे. किसान रेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माल देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात जावू शकतो. तेथे शेतकऱ्यांना कुणीही अडवणार नाही. एक देश, एक बाजारपेठ होईल. तेथे कुणी सेस मागणार नाही. शेतकरीच बाजाराचा मालक होईल. आडत्या आणि दलालांच्या ताब्यातून बाजारपेठ मोकळी होईल.''
ते म्हणाले, ""पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला न्याय कुणी मिळवून दिला. मोदीजींनी धोरण ठरवले आणि उसाला पूर्ण एफआरपी देता यावी म्हणून साखरेचा किमान दर निश्चित केला. शेतकऱ्यांना साडेतीन हजार कोटीचे अनुदान थेट देण्याची व्यवस्था केली. साखर कारखानदारी कधीच बुडणार नाही, अशी व्यवस्था करण्यासाठी साखरेशिवाय इथेनॉल निर्मितीसाठीचे पक्के धोरण ठरवले.''