शेतकऱ्यांत चिंता; ज्वारी, कांदा, गव्हासह विविध पिकांवर रोग

शेतकऱ्यांत चिंता; ज्वारी, कांदा, गव्हासह विविध पिकांवर रोग
Updated on

वैराग (सोलापूर) : आता ढगाळ वातावरणामुळे पिकेही आजारी पडू लागली आहेत. रब्बी हंगामातील इतर पिकांसह कांदा पिकास मोठा फटका बसू लागला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. रब्बी हंगामातील मागास ज्वारी, कांदा, गहू, मका, पालेभाज्या, फुलझाडे, फळपिकांवर मावा तसेच करपा रोगाचे सावट होऊ लागल्याने रोगट हवामानाच्या प्रादुर्भावाने पिकांच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती निर्माण होऊ लागली आहे. 

चालू वर्षी खरीप व रब्बी या दोन्हीही हंगामांत शेतकऱ्यांना दूषित हवामानाशी दोन हात करीत पीक उत्पादन काढावे लागत आहे. रब्बी हंगामातील सुरवातीच्या आगाप कांदा पिकाला अगदी लागवडीपासूनच रासायनिक औषधांची फवारणी करावी लागली. मात्र, थंडीच्या आगमनानंतर कांद्याला बोटावर मोजता येतील इतके दिवसच पोषक वातावरण प्राप्त झाले होते. परंतु आगाप कांदा पूर्णत्वास येण्याच्या कालावधीत पोषक हवामानाने साथ सोडल्याने पीक रोगराईने ग्रासले आहे. परिणामी कांदा उत्पादनात कमालीची घट दिसून येत आहे. 

विशेषतः चालू हंगामात मागास कांदा, वाल, मका, फुलझाडे, पालेभाज्या, तोडीव पीक तसेच फळपिके पिकवण्याकडे शेतकरी आकर्षित झाला आहे. परंतु, गेल्या आठ-दहा दिवसांपासून कमालीचा बदल घडून येत आहे. आकाशात ढगांची वर्दळ वाढत असल्याने हवामानात उष्णता निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे मागास लागवड युक्त कांदा पिकासह कोबी, फ्लॉवर, मका, पालेभाज्या, वाल व वेलवर्गीय पिकांच्या वाढी खुंटल्या जाऊ लागल्या आहेत. 

विशेष तपशील 
- शेतीसाठी मुबलक पाणी ही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची जमेची बाजू ठरत असते. मोठ्या श्रमातून कांद्या पिकासाठी शेतकऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. चालू वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त होत असल्याने अनेक शेतकरी मागास कांद्याकडे आकर्षित झाले आहेत. मात्र, हवामानाची साथ मिळत नसल्याने मागास कांदा लागवडी धोक्‍यात येत आहेत. 

- मागास कांद्यापाठोपाठ इतर पिकांवर करपा, मावा, तुडतुडे, पीळ, चिकटा व अळी रोगांचा अधिक प्रादुर्भाव होऊ लागल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. वारंवार बदलत्या वातावरणामुळे पिकांना फटका बसू लागला आहे. दर मिळणाऱ्या कांद्याला मात्र ढगाळ वातावरणामुळे आजाराची लागण झालेली दिसत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com