मिरज दर्ग्यात दर्शनासाठी नियमांचे काटेकोर पालन होणार

There will be strict adherence to the rules for darshan in Miraj Dargah
There will be strict adherence to the rules for darshan in Miraj Dargah
Updated on

मिरज : शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या ख्वाजा मिरासाहेब दर्ग्यात सोमवारपासून सुरू होणाऱ्या दर्शनाची जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी दर्गा परिसराची साफसफाई करण्यात आली. दर्गा परिसरात सॅनिटायझर आणि आणि सूचना फलक लावण्यात येत आहेत. 

दर्शनासाठी भक्तांची गर्दी होऊ नये, या उद्देशाने रांगेची शिस्त आणि सुरक्षित अंतराच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याचे दर्गा व्यवस्थापन समितीचे सदस्य जानीब मुश्रीफ आणि नजीर मुतवल्ली यांनी सांगितले. 

दरम्यान, दर्ग्यामध्ये दिवाळीनिमित्त भक्तांनी आज फराळाचा नैवेद्य दाखविला. मिरज शहरासह कर्नाटकातील अनेक हिंदू परिवारामध्ये दिवाळी फराळाचा नैवेद्य दर्ग्यास दाखविल्यानंतरच फराळाचे सेवन आणि आप्तेष्टांना वाटप केले जाते. दर्ग्याला हा नैवेद्य म्हणून फराळ घेऊन आलेल्या भक्तांचीही बऱ्यापैकी गर्दी झाली होती. अनेक भक्त दर्गा परिसरातील गरीब आणि गरजू व्यक्तीनाही फराळाचे वाटप करतात. यावर्षीही ही परंपरा भक्तांनी जोपासली.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

ethanol petrol causing bike engine problems
Forest Department leopard rescue operation
Chandoli Dam rainfall update today
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com