उदयनराजेंना उगीच घेतले का ? मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

पश्‍चिम महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा मजबूत किल्ला तयार होत असून, अभुतपूर्व जनादेश विधानसभेला आम्हाला मिळेल. त्याचे प्रत्यंतर येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल. 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कऱ्हाड ः सातारा लोकसभेचा मतदारसंघ शिवसेनेकडे असून उदयनराजेंना उमेदवारी कशी मिळणार या प्रश्‍नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंना उगीच घेतले का ? अशी टिप्पणी केली. 
दरम्यान सातारा एमआयडीचा प्रश्नाचा लवकरच निर्णय होईल. दिल्ली - मुंबई औद्योगिक कॉरीडोरच्या धर्तीवर मुंबई - बंगळूरू कॉरीडोर सुरू करण्यात येत असून, त्यात सातारा जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामाध्यमातून सातारला औद्योगिकरण वाढवण्यास प्रयत्न केला जाईल असे त्यांनी नमदू केले.

अन्य एका प्रश्‍नांवर श्री. फडणवीस म्हणाले,"" उदयनराजे हे मुक्त विद्यापीठ आहे. जिथे शिस्तीची आवश्‍यकता तेथे ते शिस्तबध्द असतात. जिथे जनतेला जे आवडते तिथे ते त्यांच्या स्टाईलने वागतात. त्यामुळे माध्यमांना अधिकार आहे, तुम्ही लिहा, सत्य काय आहे, ते जनतेला समजते. उदयनराजेंच्या येण्याने महाराष्ट्र हर्षित आहे.'' 
सातारा लोकसभेचा मतदारसंघ शिवसेनेकडे असून उदयनराजेंना उमेदवारी कशी मिळणार या प्रश्‍नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उदयनराजेंना उगीच घेतले का ? अशी टिप्पणी केली.
रामराजें निंबाळकर संपर्कात आहेत का ? या प्रश्‍नावर त्यांनी योग्यवेळी सर्व गोष्टी समजतील, असे सांगितले.

राष्ट्रीय महामार्गाची कामे निधीमुळे ठप्प नसल्याचे सांगत ते म्हणाले, "" एकावेळी रस्त्यांची खूप कामे मंजूर केल्यामुळे अनेक ठेकेदारांनीही खूप कामे घेतली. त्यामुळे काही कामे त्यांनी सुरू केली. काही कामे केली नाहीत. त्यामुळे अनेक कामे ब्लॅकलिस्ट करून दुसऱ्यांना द्यावी लागणार आहेत.'' 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Therefore we have took Udayanraje bhonsle