
सांगली- "कोरोना' चा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये म्हणून यापूर्वीच सीमा बंद करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील आणखी 75 लहान-मोठे रस्ते बंद करण्यात आले आहेत. 3 मे पर्यंत "लॉकडाऊन' च्या काळात हे रस्ते बंद राहणार आहेत. 75 रस्ते बंद केल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेसाठी 34 रस्ते पर्यायी मार्ग म्हणून खुले ठेवले आहेत.
इस्लामपुरातील 26 कोरोनाग्रस्त रूग्ण बरे झाले आहेत. तर सांगलीतील विजयनगर येथील एका बॅंक कर्मचाऱ्याचा "कोरोना' मुळे मृत्यू झाला आहे. त्याच्या कुटुंबातील पाचजणांचा आणि संपर्कातील 11 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही "कोरोना' चा धोका टळलेला नाही. प्रशासन गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करत आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग 75 लहान-मोठे रस्ते रहदारीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरचे रस्ते 3 मे पर्यंत बंद राहतील. हे रस्ते बंद केल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी पर्यायी 34 रस्ते सुरू ठेवले आहेत. संबंधित भागातील शेतकऱ्यांना शेताकडे पायी जाता येईल. मात्र वाहन असेल तर पर्यायी रस्त्याचा वापर करावा लागेल असे आदेश पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी दिले आहेत.
पोलिस ठाणे निहाय बंद केलेले रस्ते : सांगली ग्रामीण ठाणे : आष्टा ते दुधगाव, कुची ते माळवाडी, मिरज ग्रामीण : खटाव ते केंपवाड, लक्ष्मीवाडी ते मंगसुळी, लोकूर, जानराववाडी ते मदभावी, बुबनाळ, परळहट्टी, नरवाड ते लोकूर. गांधी चौक : अर्जूनवाड ते कृष्णा घाट. विटा : भिकवडी ते मायणी, कलेढोण ते भिकवडी, देविखिंडी ते कलेढोण, वेजेगाव ते कलेढोण, माहुली ते चितळी, चिखलहोळ ते चितळी. आटपाडी : दिघंची ते पंढरपूर (उंबरगावमार्गे), मायणी, म्हसवड, आटपाडी ते कोळे (शेटफळे मार्गे), सांगोला (पिंपरी खुर्दमार्गे), कडेगाव : बेंबाळेवाडी रस्ता, टेंभू कालव्याकडील रस्ता. चिंचणी-वांगी : सोनसळ घाट, आष्टा : आष्टा ते शिगाव बायपास. शिराळा : बायपास रस्ता. कासेगाव : मालखेड फाटा, दगडेमळा, बेलवडे बुद्रुक-कासेगाव रस्ता. कोकरूड : बिळाशी ते भेडसगाव, चरण ते सोंडोली, आरळा ते शित्तूर, सोनवडे ते उखूळ, पाचगणी ते बुरबुशी. जत : जत ते शिंगणापूर, एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, सिंदूर, उमराणी, खोजनवाडी, रावळगुंडवाडी, मुचंडी, सिद्धनाथ, सिंगनहळ्ळी, वायफळ, खैराव, निगडी. कवठेमहांकाळ : नागजफाटा, अथणी ते लोणारवाडी, अथणी ते सलगरे, अनंतपूर ते लोणारवाडी, खिळेगाव ते लोणारवाडी, शिरूर ते सलगरे. उमदी : चडचण, सोनलगी ते देव निंबर्गी, सुसलाद ते जिगजेनी, अक्कळवाडी ते कनकनाळ, गिरगाव ते हिंचगिरी, गुलगुंजनाळ ते कन्नूर, कोणबगी ते जालगिरी, कागनरी ते टक्कळगी, धुळकरवाडी ते धंदरगी, जालीहाल खुर्द ते घोणसगी, लवंगा ते मडसनाळ, जाडरबोबलाद ते सलगरे (सोलापूर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.