
सांगली ः ते दोघे मित्र-मैत्रिणी...परवा लाईव्ह होते इन्स्टाग्रामवर...एकमेकांशी खूपकाही शेअर करत होते...गप्पांचा तासभर फड रंगला...दोन महिने त्यानं काय केलं, तिनं काय-काय नवीन शिकलं, हे सारं एकमेकांना सांगितलं जात होतं...शेअरिंगला शब्दांची साथ नव्हती. सारं शांत, अबोल होतं... संवादाची ही "लाईव्ह खामोशी' शेकडो लोक पाहत होते.
कदाचित, अनेकांना ते काय बोलताहेत कळतही नसेल, मात्र पाहणाऱ्यांच्या डोळ्यात वेगळी चमक होती. मूकबधिर मित्र-मैत्रिणीचा तो संवाद सोहळा बोलक्या माणसांना निशब्द करायला लावणारा होता. असा हा सोहळा रोज रंगतो. कधी इन्स्टाग्रामवर तर कधी फेसबूकवर. एकाच शाळेत, कॉलेजमध्ये शिकणारे मित्र, मैत्रिणी कोरोना संकटामुळे दोन-अडीच महिने एकमेकांना भेटले नाहीत. या काळात त्यांनी मोकळ्या वेळेचा भन्नाट सदुपयोगही केला आहे. या काळात कुणी काय केलं, कसा वेळ चाललाय, यावर वेगवेगळे लोक एकमेकांशी खूप-खूप गप्पा मारतात. हातवाऱ्यांची भाषा गतीमान आहे. पटापट एकमेकांना प्रतिसाद देतात.
त्यांना ते पर्सनल खात्यावर करता आलं असतं, ते वॉटस्अप व्हिडिओ कॉल करू शकले असते. ते त्यांनी मुद्दामहून टाळलं. त्यांनी हा संवाद मुक्त ठेवला. सर्वसामान्यांना, बोलता येणाऱ्यांना हे पाहता आलं पाहिजे, अशी व्यवस्था केली. त्यामुळे त्यांचा हा खामोश संवाद सर्व "युजर्स' ना वेगळा आनंद देणारा ठरतोय.
मूकबधीर तरुण, तरुणीचे फेसबूक, वॉटस्ऍप, इन्स्टाग्राम या सगळीकडं खातं आहे. त्यांचा मित्रवर्गही खूपच मोठा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषांत ते व्यक्त होतात. त्यात आता त्यांच्या लाईव्ह संवादाची भर पडली. सध्या अनेक सेलिब्रेटी लाईव्ह येतात. एकमेकांशी गप्पांचा फड रंगवतात. चाहत्यांसाठी खुला करतात. प्रतिसादही मिळतोय. या गर्दीत एक वेगळा प्रयोग मूकबधिर विश्वातून समोर आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.