esakal | यांची आहे शाळा सुरू करण्यात हरकत; शैक्षणिक सत्राचे प्रारूप शासनाला सादर 
sakal

बोलून बातमी शोधा

They have trouble starting school; Draft of the academic session submitted to the Government

कोरोना पार्शभूमीवर शैक्षणिक सत्राबाबत राज्य शासनाने मागितलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रारूप सादर केले. परिषदेच्या अभ्यास गटाने राज्यातून माहिती संकलित केली. त्यातील मुद्दे आज सादर केले. 

यांची आहे शाळा सुरू करण्यात हरकत; शैक्षणिक सत्राचे प्रारूप शासनाला सादर 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

विटा (जि सांगली ) ः कोरोना पार्शभूमीवर शैक्षणिक सत्राबाबत राज्य शासनाने मागितलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने प्रारूप सादर केले. परिषदेच्या अभ्यास गटाने राज्यातून माहिती संकलित केली. त्यातील मुद्दे आज सादर केले. 

प्रारूपातील मुद्दे असे ः सध्याचा कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शैक्षणिक सत्र सुरू करण्यासाठी अनुरूप परिस्थिती निर्माण झाल्यावरच टप्प्याटप्प्याने सत्र सुरू करावे. 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 12 व महाविद्यालयीन असे टप्पे करावे. पूर्व प्राथमिक शाळा शक्‍यतो सुरू करू नये, सॅनिटायझर व मास्क शाळांना पुरवण्यात यावे. वेळ सकाळी 9 ते दुपारी 4 असावी. बैठक व्यवस्था एका वर्गात 20 ते 25 विद्यार्थी असावेत. शिक्षक पदे मंजूर करावीत. प्रत्येक शाळेत एक शारीरिक शिक्षक असावा. नियोजित अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या बंधनाऐवजी इयत्ता निहाय क्षमता विकसित करण्याचे काम करावे,

अत्यावशक कामाचे दिवस उपलब्ध करून देण्यासाठी सुटयांचा कालावधी कमी करावा, स्वाध्याय प्रक्रियेचा वापर करावा, ऑनलाईन अध्यापन हा पर्याय नाही. तो पूरक आहे. त्याचा वापर व्हावा, माध्यान्ह भोजन व्यवस्था शैक्षणिक सत्रापुरती स्थगित ठेवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शारीरिक अंतराचे पालन करून तांदूळ वाटप करावा, एका परिसरातील शाळा संसर्ग होऊ नये म्हणून शाळा भरणे व सुटण्याची वेळ यात अंतर असावे.

सत्राच्या सुरवातीला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची कोरोना रॅपीड टेस्ट घ्यावी. विमा काढावा, शिक्षकांना अतिरिक्त ठरवू नये, 12 वीचा पाठ्यक्रम जुनाच ठेवावा, नवीन शिक्षक भरती बंदीतून शिक्षण विभागाला वगळावे, शिक्षणातील प्रलंबित समस्या तत्काळ निकाली काढाव्यात. 
विद्यार्थी राष्ट्रीय संपत्ती आहेत. त्यांच्या जीविताचे रक्षण करणे गरजेचे आहे. 15 व 26 जूनपासून कोणत्याही स्थितीत शाळा, महाविद्यालये सुरू करू नयेत. कोरोना संकट संपुष्टात आल्याची खात्री झाल्यावर शाळा व महाविद्यालये सुरू करावीत. 

प्रारूप अभ्यास गट प्रमुख सौ. पूजा चौधरी, वेनुनाथ कडू, नरेंद्र वाटकर, किरण भावठणकर, सुनील पंडित, बाबसाहेब काळे, भगवानराव साळुंखे, आमदार नागो गाणार, राजेश सुर्वे, सुधाकर मस्के, निरंजन गिरी, विलास सोनार, संजय यवतकर, जितेंद्र पवार, राजकुमार बोनकिले यांनी हे प्रारूप मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, वित्तमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांना देण्यात आले.