ते जाणार आपल्या गावी:मिरज तालुका प्रशासनाकडून तयारी सुरू

they will return to there home place: Miraj taluka administration starts preparations
they will return to there home place: Miraj taluka administration starts preparations
Updated on: 

मिरज : मिरज तालुक्‍यात अडकून पडलेल्या परप्रांतीयांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठीची प्रशासकीय तयारी सुरू झाली असल्याची माहिती तहसीलदार रणजित देसाई यांनी दिली. यासाठी 32 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर दहा ते अकरा दिवसांनी या सर्व परप्रांतीयांच्या प्रवासास सुरवात होईल असेही तहसीलदार देसाई यांनी सांगितले. 

श्री. देसाई म्हणाले,""सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांसह तालुक्‍यात आतापर्यंत 5 हजार 593 परप्रांतीयांची नोंदणी शासनाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून झाली आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. या सर्वांची आरोग्य तपासणी करून त्यांच्याकडील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी 32 अधिकाऱ्यांच्या अखत्यारित 32 सुविधा केंद्रे तयार करण्यात आली आहेत. या ठिकाणी संबंधित परप्रांतीयांना सुरक्षित अंतराचा नियम पाळूनच त्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. ही नोंदणी झाल्यानंतर त्यांची त्याच ठिकाणी वैद्यकीय तपासणी करण्यात येईल, यासाठीही शहरातील सेवाभावी डॉक्‍टरांकडे सहकार्य मागण्यात आले आहे. डॉक्‍टर मंडळींनीही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. 

या सर्व प्रवासासाठी त्यांच्या गावाकडे जाण्यासाठी आठ पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये रेल्वे, सार्वजनिक बस, खासगी बस, खासगी चार चाकी, खासगी दोन चाकी, तसेच अन्य साहित्य नेण्यासाठी मालमोटार ट्रॅक्‍टर यासारख्या वाहनांचाही पर्याय समावेश आहे. या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता शासनाने निर्धारित केलेल्या लिंक वरच करण्यात येणार आहे.

लिंकद्वारे पूर्तता करण्यासाठी संबंधित केंद्रांवरील अधिकारी परप्रांतीयांना मदत करतील. यासाठीची कागदपत्रेही मराठी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहेत. येत्या तीन दिवसांत त्यासाठीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यानंतर हे काम संबंधित 32 सुविधा केंद्रांवर सुरू होणार असल्याचेही श्री. देसाई यांनी सांगितले.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com