सांगली : नेहमी गजबजलेला पुष्पराज चौक. याच चौकात चोवीस तास वाहतुकीची वर्दळ असते. या चौकातील पश्चिम बाजूला कर्मवीर पतसंस्था (Karmaveer Patsanstha) आहे. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास एक वृद्ध चाळीस तोळे सोने घेवून लॉकरमध्ये ठेवण्यासाठी निघाले होते. त्यांच्या मागावर चोरटा होता. दरम्यान, ते वृद्ध चारचाकीतून खाली उतरले.