बापरे..मिरजेतील ब्राह्मणपुरीत वृद्धेला खाली पाडून दागिने लांबवले 

CHAIN SNATCHING.jpg
CHAIN SNATCHING.jpg
Updated on

मिरज (सांगली)- पोलिसांचा गुन्हेगारांवर धाकच राहिला नसल्याने शहरातील गुन्हेगारी पुन्हा जोमाने फोफावते आहे. शहरातील ब्राह्मणपुरी आणि अन्य नागरी वस्त्यांमध्ये चेन स्नॅचींग करणाऱ्या टोळ्यांनी रेकी करुन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करण्यास सुरवात केली आहे. सोमवारी (ता. 8) रोजी माधवी आठल्ये या वृध्द महिलेस धक्का देऊन खाली पाडून मारहाण करुन तिच्या गळ्यातील तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. नेहमीप्रमाणे मिरज शहर पोलिस ठाण्यातील गुन्हा अन्वेषण विभागाच्या कर्मचा-यांनी या परिसरातील सीसीटिव्ही तपासण्याचे सोपस्कार पार पाडले. तसेच महिलेच्या नातेवाईकांची समजूत काढली. 


दोन महिन्याच्या लॉकडॉउनमुळे गप्प राहिलेल्या गुन्हेगारी टोळ्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. सोमवारी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास शहरातील माधवी शरदचंद्र आठल्ये (वय 75) या ब्राह्मणपुरीतील रानडे वाड्यासमोरुन जात होत्या. तेव्हा अंधारात मोटारसायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी माधवी आठल्ये यांच्या गळ्यातील सोन्याचा पोहेहार आणि साखळी ओढण्याचा प्रयत्न केला. पण माधवी आठल्ये या सावध होत्या. त्यांनी आरडाओरड केला. तेव्हा दोघा चोरट्यांनी आठल्ये यांना रस्त्यावर आडवे पाडले आणि त्यांना मारहाण गळ्यातील तीन तोळ्याचे तब्बल दोन लाख रुपयांचे दागिने लुटून नेले. 


अवघ्या काही सेकंदात हा प्रकार घडला. चोरटे पळाल्यानंतर घटनास्थळी गर्दी जमली. पोलिसांना कळवण्यात आले. तेव्हा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हा अन्वेषणचे नेहमीचेच कर्मचारी आले. चोरट्यांना आता काही मिनीटात पकडू असा अविर्भाव दाखवला. त्यांनी परिसरातील खासगी सीसीटीव्ही तील चित्रीकरण तपासले. आठल्ये यांची फिर्याद नोंदवुन घेण्यात आली आहे. कसून तपासही सुरू असल्याचे सांगण्यास पोलिसांनी सुरवात केली. त्यामुळे चोरट्यांना पकडणार काय? याकडे लक्ष लागले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com