कुर्डुवाडी : सिग्नलची तार कट करून सांगली-परळी पॅसेंजर (Sangli-Parali Passenger) थांबवून चोरट्यांनी गाडीवर दगडफेक करत, एका प्रवाशाची बॅग लांबवली. या दगडफेकीत चार प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना गुरुवार (ता. १०) रात्री साडेबाराच्या सुमारास कुर्डुवाडी रेल्वे स्थानकाजवळील डाऊन सिग्नलजवळ घडली. याबाबत रेल्वे प्रवासी धनंजय सावंत (रा. जत, जि. सांगली) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी रेल्वे पोलिसांत (Kurduwadi Railway Police) या घटनेची नोंद करण्यात आली आहे.