ट्रक झाला पलटी ; 160 पोती साखर गायब....

thieves removing a bag of sugar from the vehicle involved in the accident belgum news
thieves removing a bag of sugar from the vehicle involved in the accident belgum news
Updated on

बेळगाव - अपघात झालेल्या वाहनातील साखरेची पोती चोरट्यांनी लांबवल्याची धक्कादायक घटना आज (ता.17) उघडकीस आली. शिवापूर ते सुतगट्टी या दरम्यान ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. चालक गंभीर जखमी झाला. या वाहनातील साखरेची पोती चोरट्यांनी लांबवली आहेत. याविरुध्द पोलिसांत तक्रार नोंद झाली आहे. सुमारे 3 लाख 60 हजार रुपयांची 160 पोती चोरट्यांनी लांबवली आहेत.

साखरेच्या पोत्यांनी भरलेला ट्रक महाराष्ट्र राजगोळहून बेळगावला येण्यासाठी सोमवारी (ता.15) नऊच्या सुमारास निघाला. वाहन शिवापूर सुतगट्टीजवळ पोचल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रक एका बाजूला कलंडला. यात चालकही जखमी झाला. मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. पण, मदत मिळाली नाही. या दरम्यान काही चोरट्यांनी ट्रकमधील पोती गायब केली. डोक्‍यावर, पाठीवर, दुचाकी आणि काहींनी चक्क चारचाकी वाहनांमधून साखरेची पोती लांबवली. एकीकडे अपघाच्या धक्‍क्‍यातून चालक सावरत असताना दुसरीकडे मानुसकीच हरवत चालल्याची अनुभूती आली.

ट्रकमध्ये सुमारे तीनशे साखरेची पोती होती. त्यापैकी 190 पोती चोरीला गेले आहेत. परिसरातील ग्रांमस्थांसह मार्गावरून ये जा करणाऱ्यांनी साखरेची पोती लुटल्याचे काकती पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारी म्हटले आहे. काकती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीशैल कौजलगी यांनी भेट दिली आणि पंचनामा करून परिसरामधील नागरिकांनी स्वतःहून साखर परत केल्यास उत्तम अन्यथा तपासणी हाती घेण्यात येईल, कारवाई हाती घेण्यात येईल, अशी माहिती यावेळी दिली.
 

"शिवापूर-सुतगट्टी राष्ट्रीय महामार्गावर अपघात घडला. अपघातानंतर वाहनातील साखरेची पोती लांबविण्यात आली आहेत. सुमारे 3 लाख 60 हजार रुपयांची साखरेची चोरी झालेली आहे. त्याबाबतची तक्रार दाखल करून घेतली आहे. शिवाय स्वतःहून साखर परत करण्याबाबत कळविले आहे. अन्यथा पोलिसांमार्फत चौकशी, तपासणी करण्याचा विचार आहे.'' - श्रीशैल कौजलगी पोलिस निरीक्षक, काकती ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com