भैरवनाथ मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी पळविली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

पारनेर (नगर) : जातेगाव (ता. पारनेर) येथील भैरवनाथ मंदीरातील चार दान पेट्या फोडून त्यातील पैशाची चोरी झाली आहे. मंदीरातील तीन सीसीटीव्हीचे कॅमेरेही चोरट्यांनी लंपास केले. सहा महिन्यापूर्वी मंदीरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या होत्या. अद्याप त्याचा तपास लागलेला नसताना पुन्हा त्याच मंदिरात चोरी झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

भैरवनाथाचे मंदीर गावापासून दूर व खोल दरीत आहे. त्यामुळे येथे रात्री कोणीच राहात नाही. काल (ता. 24) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मंदीराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. चोरटे रात्रभर मंदीरातच होते. चोरट्यांनी प्रथम सीसीटीव्हीचे कनेक्‍शन व कॅमेरे तोडले त्यानंतर मंदीरातील पाच पैकी चार दानपेट्या फोडल्या. एक दानपेटी त्यांना फोडता आली नाही. एक पेटी मंदीराच्या पाठीमागील बाजूस नेऊन फोडली आहे. दानपेटीत किती रक्कम होती, हे समजू शकले नाही. सुमारे 20 ते 25 हजार रूपये दान पेटीत असावेत, असा आंदाज आहे.

मंदीरात नाथांच्या मूर्तीजवळ असलेली तलवारही चोरटे घेऊन गेले. मागील चोरीच्या वेळी चोरट्यांनी एलईडी ही फोडला होता. या वेळी मात्र एलईडीला हात लावलेला नाही. सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्या चोरटे कैद झाले आहेत. मात्र, त्यांनी चेहेरे झाकलेले असल्याने ते ओळखू येत नाहीत.

(चौकट)
तालुक्‍यात अनेक मंदीरातील दानपेट्यांची चोरी झाली. मात्र, या चोरीबाबत कोणीच पाठपुरावा करत नसल्याने आरोपीही सापडत नाहीत. पोलिसही आरोपींचा शोध घेण्याची तसदी घेत नाहीत. पारनेर शहरातील नागेश्वर मंदीरातील नागेश्वरांच्या मुखवट्यांसह कर्जुले हर्या, सुपे आदी ठिकाणच्या दानपेट्या अनेक वेळा चोरीस गेल्या. परंतु त्याचाही तपास अजून लागलेला नाही.
---

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves robbed the donation box in the Bhairavnath Temple