esakal | विधानसभा निवडणूक कामात सांगलीचा तिसरा क्रमांक
sakal

बोलून बातमी शोधा

collector office.jpg

विधानसभा निवडणूक कामात सांगलीचा तिसरा क्रमांक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सांगली-विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महसूल प्रशासनाने केलेल्या कामात सांगली जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक आला आहे. औरंगाबाद आणि सांगलीला तिसरा क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीसाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून स्वाती देशमुख यांनी काम पाहिले. या शिवाय प्रत्येक विधानसभा निहाय निवडणूक निर्णय अधिकारी, विविध प्रमुख पदांवर काम पाहणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामांचा हा गौरव मानला जातो. 

भारतीय निवडणूक आयोगाने याबाबत मानांकन जाहीर केले आहे. त्यासाठी कोणताही प्रस्ताव प्रशासनाने मागवला नव्हता. यासाठी राज्यात सन 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक प्रशासकीय कामाची तयारी घेतली आहे. निर्भय, मुक्त, पारदर्शी वातावरणात निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी प्रभावी, उत्कृष्ट कामगिरी केलेले जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणुक अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासह सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे. 


विभागनिहाय सर्वोत्कृष्ट जिल्ह्यामध्ये पुणे विभागात कोल्हापूर, नागपूर विभागात गडचिरोली, औरंगाबाद विभागात औरंगाबाद, कोकण विभागात रायगड, अमरावती विभागात अकोला, नाशिक विभागात गडचिरोली प्रथम आले आहेत. 
0 सांगली, औरंगाबाद ( गुण 80.8) 
0 गडचिरोली ( 85.4) व कोल्हापूर- (82.4) 


" निवडणूक कामासाठी महसूलसह जिल्हा परिषद आणि नियुक्त सर्वच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामामुळे यश मिळाले आहे. सबंधित अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून होणारा गौरव प्रेरणादायी ठरेल.' 
सौ. स्वाती देशमुख-पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी, सांगली. 
 

loading image