ढोरजळगावसह 17 गावांमध्ये मुंबई-पुण्याहून आले हजार जण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 मार्च 2020

मुंबई, पुण्यासह देशातील इतर भागांतील नागरिक गावी आले आहेत. आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील गावांत अशा व्यक्तींची यादी करण्यात आली आहे.

अमरापूर : शेवगाव तालुक्‍यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट असलेल्या 17 गावांत मुंबई, पुणे व इतर बाहेरगावांतून 1023 व्यक्तींचे आगमन झाले असून, त्यांची यादी तयार करून त्यांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. संबंधित गावकऱ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील बडे व डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले आहे. 

मुंबई, पुण्यासह देशातील इतर भागांतील नागरिक गावी आले आहेत. आरोग्य केंद्राच्या कार्यकक्षेतील गावांत अशा व्यक्तींची यादी करण्यात आली आहे. त्यानुसार ढोरजळगाव-शे - 103, ढोरजळगाव-ने - 198, नांदूर- 148, वडुले खुर्द - 266, आखतवाडे- 96, आव्हाणे बुद्रुक - 102, अमरापूर - 110 असे एकूण 1023 जण आले आहेत.

या सर्व गावांचे सर्वेक्षण करून नवीन आलेल्या व्यक्तींना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रांतर्गत कुठल्याही व्यक्तीला कोरोनोची लक्षणे दिसून आलेली नाहीत. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, स्वतःची व कुटुंबांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य सहायक एस. के. आव्हाड व आरोग्यसेविका एन. ए. पंडित यांनी केले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands came from Mumbai-Pune in 17 villages including Dhorjalgaon