सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बंदुकीसह फिरणाऱ्या तिघांना अटक 

शिवाजीराव चौगुले 
Tuesday, 14 July 2020

शिराळा (सांगली)- सह्याद्री व्याघ्र राखीव मधील बामणोली परिक्षेत्रातील देऊर नियातक्षेत्रात विना परवाना सिंगल बोअर बंदूक व दोन जिवंत काडतुसासह फिरणाऱ्या तिघांना वन विभागाने ताब्यात घेऊन मेढा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी,दि.11 जुलै रोजी वनरक्षक (वन्यजीव) देऊर इतर वनकर्मचाऱ्यासमवेत मान्सून गस्त घालत असताना अतिसंरक्षित गाभा क्षेत्रामध्ये विरु सखाराम माने, पांडुरंग लक्ष्मण माने, बाबुराव विरु माने, राहणार टाकवली मुरा, जि.सातारा हे सिंगल बोअर बंदूक व दोन जिवंत काडतुसासह आढळून आले. अभयारण्य व सह्याद्री राखीवच्या गाभा क्षेत्रात अपप्रवेश केल्याने व शस्त्र बाळगल्याने त्यांच्या गुन्हा नोंदवण्यात करण्यात आला आहे.

प्राथमिक चौकशीनंतर त्यांना मेढा न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वन कोठडी देण्यात आली आहे पुढील तपास चालू आहे. सह्याद्री व्याघ्र राखीव , कोल्हापूर स्थित कराडचे.उपसंचालक म.ना.मोहिते , सहाय्यक वनसंरक्षक (वन्यजीव) सुरेश साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रापाल वन्यजीव बामणोली बा.दि.हसबनीस , वेळे वनपाल मो.बा.शिंदे, वनरक्षक सुरज विनकर , दा.मा.जानकर, आ.पा.माने, रु.बा.पाटील, सुमित चौघुले यांनी कारवाई केली. 

संपादन : घनशाम नवाथे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for carrying weapons at Sahyadri Tiger Reserve