श्रींगाेंदे : आदिवासी चिमुकल्याच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

संजय आ. काटे 
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

भानगाव येथे  शेतजमिनीच्या वादातून आदिवासी समाजातील दोन वर्षाच्या गणेश काळकुशा काळे चिमुकल्याचा खून झाला होता. श्रीगोंदे पोलिसांनी घटनेची खबर मिळाल्यावर अर्ध्या तासात आरोपी ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली घेत तिघांना अटक केली.

श्रीगोंदे (नगर):  भानगाव येथे  शेतजमिनीच्या वादातून आदिवासी समाजातील दोन वर्षाच्या गणेश काळकुशा काळे चिमुकल्याचा खून झाला होता. श्रीगोंदे पोलिसांनी घटनेची खबर मिळाल्यावर अर्ध्या तासात आरोपी ताब्यात घेतले. गुन्ह्याची कबुली घेत तिघांना अटक केली.

पाेलिसांनी विष्णू ज्ञानदेव आघाव (४७), विशाल विष्णू (१९), तुकाराम नाना आघाव (२१) या तिघांना अटक केली आहे.यातील मुख्य आरोपी नाना ज्ञानदेव आघाव अजून हाती लागला नसला तरी तो लवकरच गजाआड दिसेल असा विश्वास उपअधिक्षक संजय सातव व पोलिस निरीक्षक दौलत जाधव यांनी व्यक्त केला.
 या मारहाणीतगणेशचा खून होतानाच त्याचे वडील काळकुशा काळे व आई जमा काळे  हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

माहिती देताना सातव म्हणाले, भानगाव येथील या घटनेची माहिती मिळाल्यावर अर्ध्या तासात तातडीने पोलिस पथक घटनास्थळी पोचले. माहिती घेवून तिघांना ताब्यात घेतले. घटनेचे गांभीर्य ध्यानात घेवुन पोलिसांनी केलेले काम महत्वाचे ठरले. यातील मुख्य आरोपी पळाला असला तरी, तो लवकरच गजाआड होईल. अटक केलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याचेही सातव यांनी सांगितले.

मोबाईल छायाचित्रण- घटना घडत असतात एका व्यक्तीने केलेले मोबाईल छायाचित्रण पोलिसांच्या हाती लागले असल्याची माहिती आहे. याबाबत अधिक माहिती देता येणार नाही असे अधिका-यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested by minor murder case in shrigonda taluka