भाजपमध्ये जाणारे आघाडीतील तीन आमदार वेटींगवर; धाकधूक वाढली

भारत नागणे 
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसेचे अनेक मातब्बर नेते भाजप सेनेत दाखल झाले आहेत. तर, आणखी काहीजण वेटींगवर आहेत. यामध्ये पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके, अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे तर माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी भाजपाचे दार ठोठवले आहे.

पंढरपूर : विधानसभा निवडणूकीची आचार संहिता लागण्यास अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाही काँग्रेस आमदार भारत भालके, सिध्दाराम म्हेत्रे आणि राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांना अजूनही भाजप प्रवेशासाठी ग्रीनसिग्नल मिळत नसल्याने या आमदारद्वयांची धाकधुक वाढली आहे. तर, तिकडे कार्यकर्तेही संभ्रात सापडले आहेत.

राज्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसेचे अनेक मातब्बर नेते भाजप सेनेत दाखल झाले आहेत. तर, आणखी काहीजण वेटींगवर आहेत. यामध्ये पंढरपूरचे काँग्रेसचे आमदार भारत भालके, अक्कलकोटचे आमदार सिध्दाराम म्हेत्रे तर माढ्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी भाजपाचे दार ठोठवले आहे. परंतु आतून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने भाजपच्या दारात बसलेल्या या आमदारांची आता चांगलीच धाकधूक वाढली आहे. 

आज दुपारपर्यंत राज्यात आचार संहिता लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हयातील या तिन्ही आमदारांच्या भाजप प्रवेशावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. आमदार भारत भालकेंना आमदार परिचारकांचा तीव्र विरोध आहे, तर बबनदादा शिंदेना विजयसिंह मोहिते पाटलांचा मोठा अडसर आजही कायम आहे. तर, तिकडे अक्कलकोटच्या जुन्या आणि निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यानी म्हेत्रेना विरोध केला आहे.
या सगळा अडथळयावर तिन्ही आमदार कशी मात करतात याकडेच सोलापूर जिल्हयाचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three congress MLAs may be entered BJP before Maharashtra Vidhan Sabha 2019