उमदीत तीन कोरोना पॉजिटिव्ह; सराफी व्यापाराच्या कुटुंबातील रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 12 July 2020

उमदी येथील एकुण कोरोणा रूग्ण संख्या तीन झाली आहे. 

उमदी ( ता. जत, जि. सांगली) : येथील सराफी व्यापाराच्या कुटुंबातील एकाचा अहवाल कोरोना पॉजिटिव्ह आला. गुरुवारी एकाचा तर शुक्रवारी 40 वर्षीय वडिलाचा आहवाल कोरोना पॉजिटिव्ह आला आहे. उमदी येथील एकुण कोरोणा रूग्ण संख्या तीन झाली आहे. 

येथील सराफ दुकानदारास कोरोणाची लागण झाली त्यानंतर एकाच कुटुंबातील तीघांचा अहवाल कोरोणा पॉंजिटिव्ह आला आहे. या सराफीचे दुकान कर्नाटक येथील चडचण येथे आहे. 7 जुलै रोजी सांगली येथील खाजगी दवाखान्यात उपचार घेत असताना कोरोणाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोणा टेस्ट घेण्यात आली व अहवाल पॉजिटिव्ह आल्याने त्यांच्या सोबत असणाऱ्या चालक व कुटुंबातील तीघाची टेस्ट केली असता त्यातील एकाचा अहवाल पॉजिटिव्ह आला तर सोबत आसणाऱ्या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले होते.

त्यांच्या कुटुंबातील अणखी एकाला (वडीलांना) त्रास होत असल्याने कोरोणा तपासणी केली असता त्यांचा अहवाल देखील पॉंजिटिव्ह आला आहे. असे एकाच कुटुंबातील तीघाचे अहवाल कोरोणा पॉंजिटिव्ह आले आहेत. दक्षता म्हणून प्रशासनाने चडचण उमदी रस्ता व कोरोणाग्रस्त कुटुंबाचा भाग व दुकानचा भाग सील केला आहे. तसेच सील केलेल्या भागात ग्रामपंचायतीमार्फत सर्व व्यवस्था करण्यात येत आहे.

तसेच सबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम कॉरन्टाईन, तसेच गुड्डापुर येथे संस्था विलिनिकरण करण्यात आले असून कोरोणा ग्रस्त रुग्णावरती सांगली येथे उपचार करण्यात येत असल्याची माहिती उमदी आरोग्य केद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. पवार यांनी दिली. तसेच उमदी येथे गटविकास अधिकारी अरुण धरणगुत्तीवार यांनी भेट देऊन सबंधित विभागास मार्गदर्शन केले. तसेच उमदीचे सरपंच निवृत्ती शिंदे, उपसंरपच रमेश हळके लोकांना मार्गदर्शन करत आहेत. 

संपादन - युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three corona positive at Umadi; Patients from the jweller's family