"एमपीडीए'खाली तीन गुन्हेगार स्थानबद्ध; एक वर्षासाठी कारागृहात रवानगी;

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले.
प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30, रा. चिंचोली, ता. राहुरी), रविराज जगन्नाथ भारती (वय 29, रा. कुंभारी, ता. कोपरगाव), अरुण बाबासाहेब घुगे (वय 22, रा. दीपकनगर, केडगाव) अशी त्यांची नावे आहेत.

नगर :  वाळूचोर, झोपडपट्टी दादा, धोकादायक व्यक्ती प्रतिबंधात्मक (एमपीडीए) कायद्यान्वये जिल्ह्यातील दोन वाळूचोर आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यातील एकाला पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांच्या प्रस्तावानुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी एक वर्षासाठी स्थानबद्ध केले.
प्रवीण ऊर्फ दीपक बबन लाटे (वय 30, रा. चिंचोली, ता. राहुरी), रविराज जगन्नाथ भारती (वय 29, रा. कुंभारी, ता. कोपरगाव), अरुण बाबासाहेब घुगे (वय 22, रा. दीपकनगर, केडगाव) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिस अधीक्षक सिंधू यांनी जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून एमपीडीए कायद्यानुसार तीव्र कारवाईचे संकेत दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळूतस्करांविरुद्ध कारवाई करून त्यांना एक वर्षाकरिता कारागृहात ठेवण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यातील कुख्यात वाळूतस्कर आणि अट्टल गुन्हेगार यांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते.

वाळूचोर दीपक लाटे, रविराज भारती व अट्टल गुन्हेगार अरुण घुगे यांचा प्रस्ताव राहुरी, कोपरगाव व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एमपीडीए कायद्यानुसार तयार करून अपर पोलिस अधीक्षक सागर पाटील व डॉ. दीपाली काळे यांच्याकडे पाठविला होता. त्यावर पोलिस अधीक्षक सिंधू यांनी ते प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडे पाठविले होते. काल रात्री उशिरा जिल्हाधिकारी द्विवेदी यांची त्यावर स्वाक्षरी झाली.

दरम्यान, वरील गुंडांच्या स्थानबद्धतेची कारवाई झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने वरील आरोपींना विविध ठिकाणांहून तत्काळ अटक केली, तसेच चार सप्टेंबर 2016पासून एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले. त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार मधुकर शिंदे, पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप घोडके, मोहन गाजरे, मनोज गोसावी, बाळासाहेब मुळीक, विजय ठोंबरे, विश्‍वास बेरड, संदीप पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

आगामी काळात वाळूचोर, हातभट्टी, दारूमाफियांविरुद्ध "एमपीडीए' कायद्यानुसार धडक कारवाई करण्यात येईल. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्याची गय केली जाणार नाही.
- ईशू सिंधू, पोलिस अधीक्षक

असे आहेत गुन्हे
दीपक लाटे याच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात आठ गुन्हे दाखल असून, त्यात वाळूचोरी, पर्यावरण संरक्षण गुन्ह्याचा समावेश आहे. रविराज भारती याच्याविरुद्ध कोपरगाव पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा, मारहाण, वाळूचोरीच्या गुन्ह्यासह अन्य गुन्हे दाखल आहेत. वरील दोघांनी पोलिस पथक आणि महसूलच्या पथकावर हल्ले केल्याचे गुन्हे दाखल आहेत. अरुण घुगे याच्याविरुद्ध कोतवाली, नगर तालुका पोलिस ठाण्यात, जबरी चोरी, रस्तालुटीचे गुन्हे दाखल आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three criminals will be jailed for one year at a local location