सोलापूर ग्रामीणमध्ये तिघांचा कोरोनामुळे मृत्यू ! आज 'या' गावात सापडले 20 रुग्ण 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 8 July 2020

'या' गावात सापडले नवे 20 रुग्ण 
बुधवारी (ता. 8) उत्तर सोलापुरातील बेलाटी, एकरुख, मंद्रूप, भंडारकवठे, बक्षीहीप्परगा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच माढा तालुक्‍यातील रिधोरे येथे एक तर दगड अकोले येथे प्रथमच तीन रुग्ण आढळले आहेत. तर पंढरपुरातील रूक्‍मिणी नगरात एक, मोहोळमधील नाईकवाडी वस्ती, आष्टी, कामती बु., विरवडे येथे प्रत्येकी एकास कोरोनाची बाधा झाली आहे. बार्शीतील पिंपळगाव ढाळे येथे एक तर वैराग येथे दोन रुग्ण सापडले असून अक्‍कलकोटमधील स्टेशन रोड व बुधवार पेठेत प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे. 

सोलापूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोनाचा संसर्ग आता एका गावातून दुसऱ्या गावात होऊ लागला आहे. आज (बुधवारी) उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, बार्शी, पंढरपूर, अक्‍कलकोट, दक्षिण सोलापूर, सांगोला या तालुक्‍यात नवे 20 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून मृतांची संख्या 30 झाली असून बाधितांची संख्या 607 झाली आहे. आतापर्यंत 270 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून सध्या 307 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

कोरोनामुळे 65 वर्षांवरील तिघांचा मृत्यू 
जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता 606 झाली असून त्यापैकी 30 व्यक्‍तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज (बुधवारी) बार्शीतील पिंपळगाव ढाळे येथील 65 वर्षीय पुरुषाचा, अक्‍कलकोटमधील खासबाग येथील 68 वर्षीय पुरुषाचा आणि पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या मागे राहणाऱ्या 80 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत दक्षिण सोलापूर तालुक्‍यात सर्वाधिक 213, अक्‍कलकोट तालुक्‍यात 118, बार्शी तालुक्‍यात 113, उत्तर सोलापुरात 63, पंढरपूर व मोहोळ तालुक्‍यात प्रत्येकी 33, करमाळा व माळशिरस तालुक्‍यात प्रत्येकी सहा, मंगळवेढ्यात एक, माढ्यात 16, सांगोल्यात पाच असे एकूण 607 रुग्ण सापडले आहेत. 

'या' गावात सापडले नवे 20 रुग्ण 
बुधवारी (ता. 8) उत्तर सोलापुरातील बेलाटी, एकरुख, मंद्रूप, भंडारकवठे, बक्षीहीप्परगा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. तसेच माढा तालुक्‍यातील रिधोरे येथे एक तर दगड अकोले येथे प्रथमच तीन रुग्ण आढळले आहेत. तर पंढरपुरातील रूक्‍मिणी नगरात एक, मोहोळमधील नाईकवाडी वस्ती, आष्टी, कामती बु., विरवडे येथे प्रत्येकी एकास कोरोनाची बाधा झाली आहे. बार्शीतील पिंपळगाव ढाळे येथे एक तर वैराग येथे दोन रुग्ण सापडले असून अक्‍कलकोटमधील स्टेशन रोड व बुधवार पेठेत प्रत्येकी एका रुग्णांची भर पडली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three die of corona in Solapur Rural Area