महापालिकेचे तीन कर्मचारी पॉझिटीव्ह...एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

बलराज पवार
Monday, 27 July 2020

सांगली-  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तीन कर्मचारी पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. 

सांगली-  सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तीन कर्मचारी पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे. 

महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पण, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना त्याची लागण झालेली नव्हती. मात्र कोरोनाचा आता महापालिकेतही शिरकाव झाला आहे. एका 54 वर्षीय सफाई कामगारास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांचे निधन झाले. रात्री उशिरा त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले.

याबरोबरच महापालिकेतील आणखी तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले आहेत. तसेच महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या रॅपिड अँटीजेन टेस्टमध्ये 58 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. आज एकूण 518 नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 58 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यामुळे महापालिका क्षेत्रात आजही कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three employees of municipal corporation positive . Death of a cleaning worker

Tags
टॉपिकस
Topic Tags: