झाेपेतच तिघा मायलेकावर केले सपासप वार आणि...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 January 2020

गाढ झोपेत असताना अज्ञात मारेकऱ्यांनी एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुन हत्या केली आहे. हे तिहेरी हत्याकांड दोडवाड (ता. बैलहोंगल) येथे घडले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

बेळगाव : गाढ झोपेत असताना अज्ञात मारेकऱ्यांनी एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुन हत्या केली आहे. हे तिहेरी हत्याकांड दोडवाड (ता. बैलहोंगल) येथे घडले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शनिवार (ता.18) मध्यरात्री ही घटना घडली असून तालुका पंचायत माजी समस्य शिवानंद अंदानशेट्टी पत्नी शांतव्वा आणि मुलगा विनोद अशी मृतांची नावे आहे. लोखंडी रॉंडने वार करण्यात आल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या हत्याकांडाची नोंद दोडवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. 

हे पण वाचा -  ... तर सीमा वादावर तोडगा निघू शकतो; संजय राऊतांनी सुचविली नामी शक्कल 

तालुका पंचायत माजी सदस्य शिवानंद काल रात्री घरी पत्नी आणि आपल्या मुलासोबत घरी होते. मध्यरात्री 2 ते 3 च्या सुमारास तिघेही गाढझोपेत असताना अज्ञात हल्लेखोर अचानक त्यांच्या घरात शिरले आणि कोणालाही काही कळण्याआधीच तिघांवर धारदार हत्यारांनी सपासप वार केले. त्यामुळे तीघेही जागीच ठार झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पलायन केले. आज सकाळी घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच अतिरिक्‍त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनारेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोडवाड पोलिसांनी खून प्रकरणाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल करुन घेतला आहे. लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगीतले. मयत विनोद (वय 30) याचा 30 जानेवारी रोजी विवाह ठरला होता. पण, तो बोहल्यावर चढण्यापुर्वीच त्याचा निर्घुन खून झाल्याने हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. कौटुबीक वादातून हा हे हत्याकांड झाले असल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ताघांना ताब्यात घेतल्याचे समजते. घटनास्थळी अक्षरश: रक्‍ताचा सडा पडला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three family members murder in belgaum