बार्शी, दक्षिण सोलापुरात रुग्णांचे त्रिशतक ! आज सापडले नवे 179 पॉझिटिव्ह; मोहोळ तालुक्‍यातील दोघांचा मृत्यू 

तात्या लांडगे
Saturday, 18 July 2020

ठळक बाबी... 

 • एकाच दिवशी दोन हजार 61 व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट; 179 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू 
 • दक्षिण सोलापुरात सर्वाधिक 390 रुग्ण तर बार्शी तालुक्‍यात 362 रुग्ण; अक्‍कलकोट तालुक्‍यात आतापर्यंत 292 पॉझिटिव्ह 
 • सोलापूर ग्रामीणमधील मृतांची संख्या झाली 43; अक्‍कलकोट, बार्शी, सांगोल्यात सर्वाधिक मृत्यू 
 • आज इंचगावातील 45 वर्षीय पुरुषाचा तर येवती येथील 60 वर्षीय महिला ठरली कोरोनाचा बळी 
 • जिल्ह्यातील एक हजार 754 व्यक्‍ती विलगीकरण केंद्रात तर दोन हजार 547 होम क्‍वारंटाईन 

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 10 तालुके रेड झोनमध्ये पोहचले आहेत. सांगोला तालुक्‍यात दहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून आता सात रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील रुग्णसंख्या तीनशेहून अधिक झाली आहे. दुसरीकडे अक्‍कलकोट तालुका त्रिशतकाच्या उंबरठ्यावर आहे. आज (शनिवारी) अक्‍कलकोट तालुक्‍यात 32, बार्शीत 17, करमाळ्यात दोन, माढा तालुक्‍यात 22, माळशिरस तालुक्‍यात सहा, मंगळवेढा तालुक्‍यात 37, मोहोळ तालुक्‍यात नऊ, उत्तर सोलापूर तालुक्‍यात 12, पंढरपूर तालुक्‍यात सात, सांगोल्यात तीन आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 32 रुग्णांची नव्याने भर पडली आहे. 

शहरात कोरोना वाढत असताना जिल्ह्यातील बहुतांश तालुके कोरोनापासून चार हात लांब होते. मात्र, आता सांगोला तालुका ऑरेंज झोनमध्ये असून उर्वरित दहा तालुके रेड झोनमध्ये पोहचले आहेत. लक्षणे नसतानाही कोरोना पॉझिटिव्ह असलेले बहुतांश रुग्ण घरीच बसून होते, मात्र आता रॅपिड ऍन्टीजेन टेस्टच्या माध्यमातून असे संशयित रुग्ण समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून शुक्रवारी दोनशेहून अधिक रुग्ण सापडले होते. तर आज 179 रुग्णांची त्यात पुन्हा भर पडली आहे. 

ठळक बाबी... 

 • एकाच दिवशी दोन हजार 61 व्यक्‍तींची ऍन्टीजेन टेस्ट; 179 पॉझिटिव्ह तर दोघांचा मृत्यू 
 • दक्षिण सोलापुरात सर्वाधिक 390 रुग्ण तर बार्शी तालुक्‍यात 362 रुग्ण; अक्‍कलकोट तालुक्‍यात आतापर्यंत 292 पॉझिटिव्ह 
 • सोलापूर ग्रामीणमधील मृतांची संख्या झाली 43; अक्‍कलकोट, बार्शी, सांगोल्यात सर्वाधिक मृत्यू 
 • आज इंचगावातील 45 वर्षीय पुरुषाचा तर येवती येथील 60 वर्षीय महिला ठरली कोरोनाचा बळी 
 • जिल्ह्यातील एक हजार 754 व्यक्‍ती विलगीकरण केंद्रात तर दोन हजार 547 होम क्‍वारंटाईन 
 •  

तालुकानिहाय रुग्णसंख्या 

 • अक्‍कलकोट : 292 
 • बार्शी : 362 
 • करमाळा : 21 
 • माढा : 63 
 • माळशिरस : 32 
 • मंगळवेढा : 47 
 • मोहोळ : 101 
 • उत्तर सोलापूर : 140 
 • पंढरपूर : 105 
 • सांगोला : 10 
 • दक्षिण सोलापूर : 390 
 • एकूण : 1,563  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred patients in Barshi and South Solapur today New 179 positives found