esakal | पुणे महामार्गावर अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Three killed in accident on Pune highway

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात घाटाच्या अलिकडे नगरच्या बाजुने पाठीमागून कार धडकल्याने कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. यातील एका जखमीचा रुग्णालयात पहाटे साडेपाचच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पुणे महामार्गावर अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पारनेर : नगर-पुणे महामार्गावर चास (ता. नगर) शिवारात घाटाच्या अलिकडे नगरच्या बाजुने पाठीमागून कार धडकल्याने कारमधील दोघे जण जागीच ठार झाले. यातील एका जखमीचा रुग्णालयात पहाटे साडेपाचच्या सुमारास उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातात अन्य एकजण गंभीर जखमी असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काल रात्री साडेबाराच्या सुमारास हा अपघात झाला. त्यात सुपे (ता. पारनेर) ग्रामपंचायतचे माजी सदस्य संदीप किसन पवार (वय : 42) यांच्यासह मोनू उर्फ भरत भाऊसाहेब नन्नवरे (वय : 22) व श्रीकांत गायकवाड (वय : 24) यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य तरुण गंभीर जखमी असून, नगर शहरातील आनंदऋषीजी हॉस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वैद्यकीय सूत्रांनी त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री साडेबाराच्या सुमारास सुपे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य पवार आपल्या कारमधून (एम एच 16 एटी 8154) नगरकडून सुप्याकडे येत होते. चास (ता. नगर) येथील घाटाच्या अलिकडे कारने वळण घेण्यापूर्वीच त्यांनी पाठीमागून पुढे जात असलेल्या मालट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यात त्यांच्या कारचा चक्काचूर झाला.

loading image