पंढरपुरात घरफोडी, तीन लाखांचे सोने- चांदीचे दागिने लंपास

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

अदिनाथ बनकर हे मूळचे बार्डी (ता. पंढरपूर) येथील आहेत. टाकळी (ता. पंढरपूर) येथील प्रतिभाताई परिचारक नगरमध्ये येथे ते राहतात. सध्या त्यांच्या शेतात डाळिंबाची काढणी सुरू असल्याने ते गेल्या 15 दिवसांपासून घर बंद करून बार्डी येथे राहण्यास गेले आहेत. दरम्यान, चोरट्यांनी रविवारी (ता. 19) मध्यरात्री ते सोमवारी (ता. 20) पहाटे दरम्यान घराच्या दरवाजाचा कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला.

पंढरपूर (सोलापूर) : बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख 23 हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने व भांडी चोरून नेली आहेत. चोरीची ही घटना सोमवारी (ता. 20) सकाळी प्रतिभाताई परिचारक नगर (टाकळी ता. पंढरपूर) येथे उघडकीस आली. याप्रकरणी आदिनाथ दगडू बनकर यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
अदिनाथ बनकर हे मूळचे बार्डी (ता. पंढरपूर) येथील आहेत. टाकळी (ता. पंढरपूर) येथील प्रतिभाताई परिचारक नगरमध्ये येथे ते राहतात. सध्या त्यांच्या शेतात डाळिंबाची काढणी सुरू असल्याने ते गेल्या 15 दिवसांपासून घर बंद करून बार्डी येथे राहण्यास गेले आहेत. दरम्यान, चोरट्यांनी रविवारी (ता. 19) मध्यरात्री ते सोमवारी (ता. 20) पहाटे दरम्यान घराच्या दरवाजाचा कडी कोयडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटात ठेवलेले पाच तोळे सोन्याचे मंगळसूत्र, अडीच तोळे सोन्याच्या बांगड्या, पाच ग्रॅमची अंगठी, दोन ग्रॅमची नथ असे आठ तोळे दोन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 80 हजार रुपये किमतीची चांदीची विविध भांडी असा एकूण तीन लाख 23 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. पोलिस निरीक्षक किरण अवचर तपास करीत आहेत. 

उपनगरात चोऱ्यांचे सत्र सुरूच... 
मागील आठ दिवसांपासून शहरातील उपनगरात घरफोड्या आणि भुरट्या चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. मागील तीन-चार दिवसांपूर्वी याच भागात घर फोडून दोन लाखांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ताजी असताना पुन्हा याच भागात मोठी चोरी झाली आहे. शहरातील उपनगरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे उपनगरातील लोकांत भीती निर्माण झाली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three lakhs looted in Pandharpur robbery