बारामतीच्या त्या व्यक्तीच्या सानिध्यात श्रीगोंद्याचे तिघे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 March 2020

आपल्यापर्यंत कोरोना येणारच नाही या भ्रमात असणाऱ्या श्रीगोंदेकरांसाठी ही बातमी महत्वाची आहे. बारामती येथील त्या व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदयातील तीन जण आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे.
 

श्रीगोंदे : बारामती येथील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर आता त्याचे लोण श्रीगोंद्यात पोचते की काय अशी भीती व्यक्त होत आहे. बारामतीच्या त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात तालुक्यातील तीन व्यक्ती आल्या आहेत.

काल रविवारी बारामती येथील एक आणि नगरच्या दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सगळीकडे खळबळ उडाली. बारामती आणि नगरच्या मध्यभागी असणाऱ्या श्रीगोंद्यातील लोक अजूनही बिनधास्त आहेत.

आपल्यापर्यंत कोरोना येणारच नाही या भ्रमात असणाऱ्या श्रीगोंदेकरांसाठी ही बातमी महत्वाची आहे.
बारामती येथील त्या व्यक्तीच्या संपर्कात श्रीगोंदयातील तीन जण आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली आहे.
आता हे तिघे जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाहीत यासाठी त्यांच्या तपासणी करण्यासाठी  नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविले जात आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी याला दुजोरा दिला आहे. त्या व्यक्तीच्या हे तिघे संपर्कात आल्याची माहिती मिळाल्याने खात्रीसाठी त्यांच्या तपासण्या करून वरिष्ठ पुढील निर्णय घेतील. दरम्यान, आता कोरोना श्रीगोंद्याच्या दारात आला याची चर्चा सुरू झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The three men of Shrigondha were in contact with that person from Baramati