जत पूर्व भागात परिपक्व द्राक्षमण्यांची गळ

Throat of mature grapes in the eastern part of Jat
Throat of mature grapes in the eastern part of Jat

संख : जत तालुक्‍यात तुरळक पाऊस, ढगाळ वातावरण, वाढती थंडी यामुळे पूर्व भागातील द्राक्षे बागायतदारांचे धाबे दणाणले आहेत. बागेतील परिपक्व द्राक्षमण्यांची गळ होऊ लागली आहे. द्राक्ष घडातील मणी तडकण्याचा धोका आहे. रॅकवर टाकलेला बेदाणा काळा पडणार आहे. पाऊस वाढला तर द्राक्षबागांची अडचण वाढणार आहे. रब्बीतील पिकांचेही नुकसान झाले आहे. 

तालुक्‍यात शेतक-यांनी कष्टाने फोंड्या माळावर द्राक्षबागा उभारल्यात. तालुक्‍यात हजार एकरवर द्राक्षबागा आहेत. पूर्व भागात दर्जेदार बेदाणा व द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. ते ऑक्‍टोबर महिन्यात छाटणी घेतात. 

हंगामाच्या सुरुवातीला पाऊस, प्रतिकूल हवामानामुळे दावण्याने बागा गेल्या. घड जिरण्याच्या समस्यांनी खूप मोठे नुकसान झाले. परतीच्या पावसाने बागेत जास्त काळ पाणी साचून घड कमी सुटले. अवेळी दोनदा झालेल्या पावसाची मोठी किंमत द्राक्ष उत्पादकांना मोजावी लागली. पहिल्या पावसातच घड कुज झाली आहे. वाढ खुंटली आहे.

संकटावर मात करीत द्राक्षबागायतदारांनी बागा घेतल्या. काही तरी पदरात पडेल ही आशा बाळगून होते. गेल्या वर्षी कोरोनाने मोठे नुकसान केले. गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू आहे. ढगाळ वातावरणाचे संकट आहे. त्याचा फटका बसणार आहे. बागेतील घडात पाणी साचून द्राक्ष मण्याची गळती व मणी तडकणार आहेत. रॅकवर टाकलेला बेदाणा काळा पडणार आहे. रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी पिकांनाही फटका बसणार आहे. 

ज्वारी भिजली, गहू पडला 
काढणी सुरु आहे. शेतात ज्वारी काढून टाकली आहे. ती भिजली आहे. काळी पडणार आहे. कडबा भिजल्याने जनावरे खाणार नाहीत. गहू यंदा जोमात आला होता. परंतु वा-याने पडला.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com