
येरमाळा : कळंब तालुक्यातील मलकापूर येथे गुरुवारी (ता.२६) रात्री अज्ञात हिंस्त्रप्राण्याने वासरावराची शिकार केल्याची घटना दहा वाजेच्या सुमारास घडली.शेतात असणाऱ्या शेतकऱ्यांना वासराला ज्वारीच्या पिकात वासराला हिंस्त्रप्राण्याने ओढत नेल्याच्या प्रकार पहिला वनविभागाला सदरील घटनेची माहिती मिळताच वनविभागचे गस्त पथक दाखल झाले होते.येडशी अभयारण्यात वाघाचा मुक्काम वाढणार असुन शेतकऱ्यात भीतीचे वातावरण असुन वनविभागाकडून शेतकऱ्यांचे सुरक्षितता,बचाव,व्याघ्रसंरक्षण या बाबत समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.