Tembhurni CrimeSakal
पश्चिम महाराष्ट्र
Tembhurni Crime : वाघाची कातडी व हस्तीदंत प्रकरणातील संशयित आरोपी अमोल शहा याची न्यायालयीन कोठडीत रवानगी
Wildlife Crime : टेंभुर्णीतील ढवळेनगरमध्ये वाघाची कातडी व हस्तिदंत बाळगल्याप्रकरणी अमोल शहा याला न्यायालयीन कोठडीत तर स्वप्नील शहा याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
टेंभुर्णी : वाघाची कातडी व हस्तिदंत तस्करी करण्याच्या हेतूने घरात बाळगल्या प्रकरणी टेंभुर्णी पोलिसांनी अटक केलेला संशयित आरोपी अमोल विजयकुमार शहा यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने माढा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकार्यांनी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.

