esakal | आठवीपर्यंतच्या मुलांसाठी "टिलीमिली' मालिका 
sakal

बोलून बातमी शोधा

doordarshan education.jpg

सांगली,  ः पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित "दूरदर्शन' महामालिका "टिलीमिली' 20 जुलै 2020 पासून "सह्याद्री' वाहिनीवर मोफत सुरू करण्यात येणार आहे. त्याचा लाभ राज्यात सर्वदूर राहणाऱ्या दीड कोटी विद्यार्थ्यांना होणार आहे. ती सलग दहा आठवडे प्रसारित केली जाणार आहे. 480 भाग असलेली मालिका रविवार वगळून पाहता येईल. पुण्यातील एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण देणार आहेत. अध्यक्ष विवेक सावंत यांनी प्रसारणाचे वेळापत्रकही जाहीर केले. 

 

आठवीपर्यंतच्या मुलांसाठी "टिलीमिली' मालिका 

sakal_logo
By
विष्णू मोहिते

सांगली,  ः पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमावर आधारित "दूरदर्शन' महामालिका "टिलीमिली' 20 जुलै 2020 पासून "सह्याद्री' वाहिनीवर मोफत सुरू करण्यात येणार आहे. त्याचा लाभ राज्यात सर्वदूर राहणाऱ्या दीड कोटी विद्यार्थ्यांना होणार आहे. ती सलग दहा आठवडे प्रसारित केली जाणार आहे. 480 भाग असलेली मालिका रविवार वगळून पाहता येईल. पुण्यातील एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन पहिल्या सत्राच्या सर्व विषयांचे मराठी माध्यमातील शिक्षण देणार आहेत. अध्यक्ष विवेक सावंत यांनी प्रसारणाचे वेळापत्रकही जाहीर केले. 


कोरोना पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे 14 मार्चपासून राज्यातील शाळा बंद असून, त्या अद्याप उघडलेल्या नाहीत. घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी राहिली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. शाळा नियमितपणे कधी व कशा सुरू होतील, याबाबत अनिश्‍चितता आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीत "एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन'ने मालिकेद्वारे मोफत अभ्यासक्रम देण्याचे ठरवले आहे. यात प्रयोगशील शिक्षणात भरीव कार्य केलेल्या "ग्राममंगलसह अन्य नामांकित संस्थांचा, तज्ज्ञांचा सक्रिय सहभाग आहे. विद्यार्थ्यांना आवडावे यादृष्टीने "टिलीमिली,' नाव दिले आहे. 
"टिलीमिली,' मालिका बालभारतीच्या सर्व पाठांवर आधारित असेल. यात मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील. मुलांना घर, परिसरात करून पाहता येतील अशा कृतिशील उपक्रमातून शैक्षणिक अनुभव दिले जातील. त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण, भावनिक सुरक्षितता असेल. चुका करत स्वत:ची अर्थबांधणी स्वत:च करण्याचे स्वातंत्र्य दिलेले असेल. असे केल्याने मुले हसत-खेळत स्वत:च कशी शिकतात, हे प्रत्यक्ष भागात बघायला मिळेल. अशी सहज, आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना मालिका रोज शिकण्याची स्फूर्ती देईल, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवेल. 

जेव्हा औपचारिक व्यवस्था बंद ठेवावी लागते. तेव्हा परिसरातील उत्साही व अभ्यासू मावशी-काका स्वयंस्फूर्तीने कसा पुढाकार घेतात. कॉलनीतील, वाडीतील, शेजारच्या एकेक दोन-दोन मुलांच्या गटांना ज्ञानरचना करायला रोज घरी कशी मदत करू शकतात, हेही मालिका जाताजाता दाखवेल. रोज प्रत्येक इयत्तेच्या एका विषयाचा एक पाठ याप्रमाणे प्रत्येक इयत्तेचे 60 पाठ, 60 दिवसांत 60 एपिसोड्‌समध्ये सादर केले जातील. आठही इयत्तांचे मिळून 480 एपिसोड्‌स महामालिका रविवार वगळून असेल. 

 • वेळापत्रक... 
 • 20 जुलै ते 26 सप्टेंबर 
 • वेळ इयत्ता 
 • स. 7.30 ते 8.00, आठवी 
 • स. 8 ते 8.30, सातवी 
 • स.9 ते 9.30, सहावी 
 • 9.30 ते 10.00, पाचवी 
 • 10 ते 10.30, चौथी 
 • 10.30 ते 11.00, तिसरी 
 • स. 11.30 ते 12, दुसरी 
 • दुपारी 12 ते 12.30, पहिली 
 • (टीप..."सह्याद्री' दूरदर्शनवरील ही महामालिका टाटास्काय, एअरटेल, डिश टीव्ही, व्हिडिओकॉन d2h, डीडी (फ्रीडिश) चॅनेल्सवर पाहता येईल.) 
 • चौकट... 

राज्यातील सर्व मुलांसाठी सह्याद्री वाहिनीवरच 13 ते 18 जुलै या कालावधीत "माझी शाळा' उपक्रम फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणार आहे. सकाळी नऊ व त्यांचे पुनःप्रसारण सायंकाळी पाच वाजता होईल. 
 


 
"" "टिलीमिली,' मालिका बालभारतीच्या पाठांवर आधारित असेल. यात मुलांना कंटाळा आणणारी सलग व्याख्याने नसतील. मुलांना घरी, परिसरात एकत्रीत करून बघता येतील अशा कृतीनिष्ठ उपक्रमातून शैक्षणिक अनुभव घेऊ दिले जातील, त्यांना ताण येऊ नये यासाठी स्वच्छ, मोकळे, आनंदी वातावरण, भावनिक सुरक्षितता असेल. आनंददायक व ज्ञानरचनावादी प्रकिया उलगडत राहिल्याने मुलांना मालिका रोज शिकण्याची स्फूर्ती देईल, त्यांचा आत्मविश्‍वास वाढवेल.'' 
-विवेक सावंत, 
अध्यक्ष, एमकेसीएल नॉलेज फाउंडेशन, पुणे. 
 

loading image