भाजपतर्फे तिरंगा यात्रा, भारत गौरव महापर्वचे आयोजन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 ऑगस्ट 2018

नगर : भारतीय जनता पक्षातर्फे 15 ते 31 ऑगस्ट या कालखंडात "नमन वीर जवानांना आणि वंदन बळिराजाला' नारा देत तिरंगा यात्रा व भारत गौरव पर्वचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनी पोलिस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर पालकमंत्री राम शिंदे हे या यात्रेचे उद्‌घाटन करतील, अशी माहिती खासदार दिलीप गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

गांधी म्हणाले, "ही तिरंगा यात्रा नगर दक्षिणेतील आठ तालुक्‍यांतील 320 गावे व वाड्यांतून जाईल. यात दोनशे दुचाकींवर भाजप कार्यकर्ते सहभागी होतील. या दुचाकी ताफ्याबरोबर जनजागृती करणारा एक रथ असेल. या रथावर एलसीडी स्क्रीन लावलेली असेल. त्याद्वारे भाजपच्या केंद्रातील चार वर्षांच्या कामांची माहिती जनसामान्यांना दिली जाणार आहे. तिरंगा रथयात्रेचे हे तिसरे वर्ष आहे. 
15 ऑगस्टपासून सुरू झालेली ही तिरंगा यात्रा पहिल्या दिवशी नगर शहरात फिरून जनजागरण करील. त्यानंतर क्रमशः नगर तालुका, पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, जामखेड, पाथर्डी, शेवगाव, राहुरी या तालुक्‍यांतून जात पुन्हा नगरला येईल.'' 

या यात्रेत स्थानिक पातळीवरील स्वातंत्र्यसैनिक जवान, तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी यांना सन्मानित केले जाणार आहे. यात्रेच्या कालावधीत भाजप कार्यालय व खासदार दिलीप गांधी यांच्या कार्यालयातून 10 हजार तिरंगा ध्वजाचे मोफत वितरण केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tiranga yatra by bjp in nagar