Belgaum : २८ गावांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Belgaum Municipal Election

Belgaum : २८ गावांचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील २८ गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठविला आहे. बुडा कार्यक्षेत्रात आधी तालुक्यातील २७ गावांचा समावेशाचा निर्णय झाला होता. त्यात बेळगाव तालुक्यातील गोजगा गावाचाही समावेश करण्याचा निर्णय २५ ऑक्‍टोबर रोजी बुडाच्या अर्थसंकल्पीय बैठकीत झाला होता.

२८ गावांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला तात्कालिक मंजुरी मिळाल्यामुळे तो अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठविला आहे. प्रस्ताव मंजुरीनंतर ही गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट झाल्यामुळे ग्रामपंचायतींच्या अधिकारावर गदा येणार नसल्याचे बुडा अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बेळगाव व परिसरातील गावांचा सुनियोजित विकासाच्या उद्देशाने कार्यक्षेत्र वाढविल्याचे बुडाचे म्हणणे आहे. गतवर्षी ४ जुलैला बुडा बैठकीत तालुक्यातील २७ गावांचा समावेश कार्यक्षेत्रात करण्याचा निर्णय झाला.

त्यात गोजगा गावचा समावेश नव्हता, पण जिल्हा पंचायतीने बुडाला पत्र पाठवून गोजगाचाही समावेशाची शिफारस केली. बुडाने २७ गावांचा प्रस्ताव गतवर्षीच मंजुरीसाठी पाठविला होता. काही त्रुटींमुळे तो परत पाठविला. बुडाने गोजगा गावचा समावेश करुन नवा प्रस्ताव तयार केला आहे. तालुक्यातील २७ गावे सध्या बुडा कार्यक्षेत्रात असून शहरालगतच्या गावांचा त्यात समावेश आहे. २०१९ साली बुडाचे कार्यक्षेत्र वाढविण्याचा निर्णय झाला. शहराच्या १५ ते २० किमी परिघातील सर्व गावे बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचे ठरले होते. त्‍यानुसार बुडाने २७ गावांच्या समावेशासह प्रस्ताव तयार केला. त्यात मण्णूर व आंबेवाडीचा समावेश होता. आता गोजगासह २८ गावांचा समावेश झाल्यास ५५ गावांवर बुडा प्रशासनाचे नियंत्रण राहणार आहे. तेथे बेकायदा ले-आऊट, लॅंड यूज बदल करता येणार नाहीत.

ही गावे होणार बुडा कार्यक्षेत्रात समाविष्ट

निलजी, मुतगा, सांबरा, शिंदोळी, बसरीकट्टी, बाळेकुंद्री बीके, बाळेकुंद्री केएच, होनीहाळ, माविनकट्टी, मास्तमर्डी, धामणे, येळ्ळूर, हट्टी, कुट्टलवाडी, नावगे, हंगरगा, मण्णूर, सुळगा, आंबेवाडी, गोजगा, कल्लेहोळ, होनगा, कडोली, अलतगा, जाफरवाडी, कलखांब, अष्टे, मुचंडी.

loading image
go to top