esakal | सातारा : एकाच दिवशी कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या आणि मृत्यूही
sakal

बोलून बातमी शोधा

corona satara

 जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 13 झाली आहे. मुंबईहून प्रवास करून आलेल्या भाटकीतील (ता. माण) 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.

सातारा : एकाच दिवशी कोरोनाबाधितांची सर्वाधिक संख्या आणि मृत्यूही

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, आज एका झटक्‍यात 80 रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 422 झाली आहे. रुग्णसंख्या वाढीबरोबर मृत्यू होणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. आज दोघांचा मृत्यू झाला, दोघांचे मृत्यू पश्‍चात अहवाल पॉझिटिव्ह आले, तर एका संशयिताचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा 13 झाला असून, कोरोनाचा मृत्यू दर तीनच्यावर गेला आहे. गेल्या 24 तासांत 97 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
 
परराज्य व परजिल्ह्यातील नागरिकांना सातारा जिल्ह्यात प्रवेश देण्यास सुरुवात झाल्यापासून कोरोनाबाधितांची संख्या तिप्पट झाली आहे. गेल्या आठवड्यापासून दररोज कोरोनाबाधित मोठ्या संख्येने सापडत आहेत. आज सकाळी आलेल्या अहवालांत एकदम 52 रुग्ण बाधित आल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासनाची धावपळ वाढली आहे. रुग्ण पॉझिटिव्ह आलेला परिसर सील करणे, सॅनिटाईज करणे, त्यांच्याजवळच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करणे आदी कामांमध्ये प्रशासन व्यस्त दिसते. 

 नवीन 28 बाधितांमध्ये वाई तालुक्यातील बारा, सातारा तालुक्यातील सात, कोरेगाव दोन कऱ्हाड तालुक्यातील सात रूग्णांचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यातील शेणोली स्टेशन येथील हे सातही रूग्ण एकाच कुटुंबातील आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह होण्याबरोबरच जिल्ह्यातील मृत्युदराचे प्रमाणही कायम आहे.

मुंबईवरून आलेल्या आसले (ता. वाई) येथील मधुमेह असलेल्या 67 वर्षीय व्यक्तीचा, तसेच अंभेरीतील (ता. खटाव) 53 वर्षांच्या पुरुषाचा आज मृत्यू झाला. त्याचबरोबर जांभेकरवाडी (ता. पाटण) येथील 70 वर्षांच्या महिलेचा व भालवडीतील (ता. माण) 62 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या 13 झाली आहे. मुंबईहून प्रवास करून आलेल्या भाटकीतील (ता. माण) 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यानंतरच त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल. दरम्यान, गेल्या 24 तासांत 97 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

आज सकाळपर्यंत आलेल्या अहवालानुसार तालुकानिहाय गाव, रुग्ण व कंसात वय पुढीलप्रमाणे : माण : म्हसवड- 48 वर्षीय पुरुष, तोंडले- 48 वर्षीय पुरुष, भालवडी- 62 वर्षीय पुरुष (मृत्यू), लोधवडे- 34 व 28 वर्षीय महिला. खटाव : वांझोली 52 वर्षीय पुरुष, अंभेरी- 14 वर्षीय युवक. सातारा : खडगाव- 48 वर्षीय पुरुष, जिमनवाडी- 21 वर्षीय युवक, कुस बुद्रुक- 45 वर्षीय महिला.

वाई : 58 वर्षीय पुरुष, आसले- 40 वर्षीय पुरुष, मालदपूर- 24 वर्षीय पुरुष, देगाव- 55 वर्षीय महिला, सिद्धनाथवाडी- 25 वर्षीय पुरुष, धयाट- 52 वर्षीय पुरुष. पाटण : धामणी- 35 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, जांभेकरवाडी- 70 वर्षीय महिला, गमलेवाडी- 31 वर्षीय पुरुष, मान्याचीवाडी- 20 वर्षीय युवक, मोरगिरी- 58 वर्षीय पुरुष व 72 वर्षीय महिला, आडदेव- 35 वर्षीय पुरुष.

खंडाळा : अंधोरी- 72 वर्षीय पुरुष व 8 वर्षीय मुलगा, घाटदरे- 47 वर्षीय महिला, पारगाव- 27 वर्षीय पुरुष, 62 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 50 वर्षीय दोन पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष. जावळी : सावरी- 39 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला व 7 वर्षांची मुलगी, केळघर 16 वर्षीय युवक, 44 वर्षीय पुरुष. महाबळेश्वर : कासरुड- 26 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय युवक, देवळी- 9 वर्षीय मुलगा, 42 वर्षीय पुरुष व एक महिला, गोळेवाडी- 42 वर्षीय महिला. कऱ्हाड : खराडे- 45 वर्षीय महिला व 55 वर्षीय पुरुष, म्हासोली- 20 वर्षीय युवती. फलटण : सस्तेवाडी- 21 वर्षीय महिला. 


रात्री नऊपर्यंत आणखी 28 बाधित 
सकाळी-सकाळी 52 रुग्ण वाढल्याने जिल्हाभरात चिंता वाढली होती. त्यानंतर दिवसभरात एकही रुग्ण वाढला नाही. मात्र, रात्री नऊ वाजता पुन्हा 28 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे दिवसभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 80 पर्यंत पोहोचला. नवीन 28 बाधितांमध्ये वाई तालुक्यातील बारा, सातारा तालुक्यातील सात, कोरेगाव दोन कऱ्हाड तालुक्यातील सात रूग्णांचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यातील शेणोली स्टेशन येथील हे सातही रूग्ण एकाच कुटुंबातील आहेत. त्यांचे  मुंबई कनेक्शन असल्याचे सांगण्यात आले आहे.

loading image