मराठी नाही तर टोल नाही; मराठीसाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आक्रमक

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आक्रमक झाली असून मराठी नाही तर टोल नाही असा इशारा युवा समितीतर्फे देण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती sakal
Updated on

बेळगाव : बेळगाव ते खानापूर पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. मात्र महामार्गावर लावण्यात आलेले दिशादर्शक फलक फक्त कन्नड व इंग्रजी भाषेत लावण्यात आल्याबाबत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आक्रमक झाली असून मराठी नाही तर टोल नाही असा इशारा युवा समितीतर्फे देण्यात आला आहे. तसेच १५ दिवसात इंग्रजी, कन्नडसह मराठी भाषेत फलक न लावल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Belgaum Marathi Language News Updates)

युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गणेबैल येथील टोल नाका येथे आंदोलन छेडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्राधिकरणाकडे मराठीतून फलक लावण्याची जोरदार मागणी केली. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी बेळगाव ते अनमोड पर्यंतच्या पट्यातील सर्व गावे मराठीबहुल आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवर दिशादर्शक व गावांची नावे लिहिताना इतर भाषांबरोबरच मराठीला प्राधान्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या संचालकांना भेटून केली होती.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती
राहुल गांधींचा गोवा दौरा लांबणीवर

त्यावेळी त्यांनी याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र बेळगाव ते खानापूर पर्यंतच्या रस्त्यावर फक्त कन्नड व इंग्रजी भाषेतून फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे कन्नड न समजणार्‍या मराठी भाषिकांची अडचण होत आहे त्याची दखल घेऊन येत्या पंधरा दिवसात फलक लावावेत. अन्यथा संपूर्ण मराठी भाषिक टोल भरणार नाहीत असा इशारा दिला.

यावेळी युवा कार्यकर्त्यांनी भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांचे हक्क मिळालेच पाहिजेत. मराठीतील फलक लागलेच पाहीजेत आदी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती
Belgaum News: कन्नडसक्ती रद्दच्या आदेशानंतरही विद्यापीठाकडून चालढकल

युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग प्राधिकरण व प्रशासनाला फलक लावण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली असून त्यानंतरही कोणत्याही प्रकारची कारवाई न केल्यास समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन तीव्र करण्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावेळी कार्याध्यक्ष किरण पाटील, सचिव सदानंद पाटील, राजू पाटील, कृष्णा कुंभार, म्हात्रू धबाले, रवी पाटील, किशोर हेब्बाळकर, भुपाल पाटील, दर्शन डिचोलकर, गणेश पाटील, नागेश कांबळे, बबलू मोटर, ऋतिक कुलम, गंगाधर गुरव, विवेक पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Eight Students Cause Trouble On ST Bus Driver Conductor Stay Alert Emergency Door Incident Ends At Police Station
NGRI geophysical survey Maharashtra
Ara grapes variety Maharashtra farmers
‘Stree: Sangharsh Te Swarajya 2026’ special issue welcomed in Kundal.
Marathi News Esakal
www.esakal.com