esakal | मिनी लॉकडाऊनच्या निषेधार्थ कुपवाडात व्यापाऱ्यांचे आंदोलन 
sakal

बोलून बातमी शोधा

Traders' agitation in Kupwara to protest mini lockdown

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनच्या निषेधार्थ कुपवाड शहर व्यापारी संघटनेने कुपवाड मुख्य सोसायटी चौकातील परिसरात बोंबाबोंब आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांनी आक्रमकता धारण केली. 

मिनी लॉकडाऊनच्या निषेधार्थ कुपवाडात व्यापाऱ्यांचे आंदोलन 

sakal_logo
By
ऋषीकेश माने

कुपवाड : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मिनी लॉकडाऊनच्या निषेधार्थ कुपवाड शहर व्यापारी संघटनेने कुपवाड मुख्य सोसायटी चौकातील परिसरात बोंबाबोंब आंदोलन केले. जोरदार घोषणाबाजी करत व्यापाऱ्यांनी आक्रमकता धारण केली. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने मिनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अंमलबजावणीमध्ये प्रशासनाने जीवनावश्‍यक सेवा वगळता. इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निर्णयाला विरोध दर्शवला. कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी सोसायटी चौकामधील फुटपाथवर बोंबाबोब आंदोलन केले. गतवर्षीच्या बंदमुळे व्यवसायात निर्माण झालेल्या विविध अडचणींची मांडणूक विविध फलकांद्वारे केली. 

व्यापारी नेते राजेंद्र पवार म्हणाले,""सरकारने जीवनावश्‍यक सुविधा वगळता इतर व्यवसायिकांच्या बाबत अचानकपणे दुकाने बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. यामध्ये व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय मागे घ्यावा.'' 

यावेळी संघटनेचे अध्यक्ष अमर दीडवळ, विठ्ठल संकपाळ, अनिल कवठेकर, बिरु आस्की, प्रवीण कोकरे, निलेश चौगुले, रमेश जाधव, अभिजित कोल्हापूरे, विजय खोत, श्‍याम भाट, सचिन नरदेकर, सूरज पवार यासह मोठ्या संख्येने व्यापारी उपस्थित होते. 

व्यापाऱ्यांचा आज थाळीनाद 
कुपवाड शहर व्यापारी संघटनेच्या वतीने मिनी लॉकडाऊन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यत ती पूर्ण होत नाही तोवर विविध आंदोलचा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आज गुरुवारी सकाळी सोसायटी चौकात ताट, वाट्या वाजवून थाळीनाद आंदोलन करणार असल्याची माहिती अध्यक्ष अमर दिडवळ यांनी दिली. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image