शासनाच्या आदेशानुसार सांगलीतील व्यापारपेठा बंद : जिल्हाधिकारी डॉ. चौधरी
सांगली- राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवण्यापूर्वी जी नियमावली जाहीर केली होती. त्यानुसारच सांगलीतील बाजारपेठा बंद आहेत. जिल्हा प्रशासनाने यामध्ये स्वत:च्या कोणत्याही अधिकाराचा वापर केलेला नाही. नजीकच्या जिल्ह्यात कारोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे. मात्र याबाबत सकारात्मक तोडगा काढण्यासाठी पालकमंत्र्यांशी चर्चा केली आहे. रविवार (ता. 10) रोजी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सांगलीतील उपनगरात व्यवहार सुरु असून प्रमुख बाजारपेठ मात्र अद्यापी बंद आहे. जिल्हा प्रशासनाने गर्दीच्या भितीने ही बाजारपेठ उघडण्यास मनाई केलेली आहे. व्यापारी बांधवांनी सोमवारपासून बाजारपेठेतील दुकाने सुरु करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाची भूमिका डॉ. चौधरी यांनी मिडीयासमोर मांडली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सोशल डिस्टंन्सिंगच्या अनुषंगाने सध्याच्या शिथिलतेचा आढवा, व्यापाऱ्यांशी रविवारी चर्चा, व्यापार संघटना व दुकानदारांकडून नियम पाळण्याचे आश्वासन, पालकमंत्री जयंत पाटील, कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाईल.' असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, 3 मे रोजी लॉकडाऊन संपणार होता. मात्र त्यामध्ये शासनाने वाढ केली. तत्पूर्वी जिल्हा प्रशासनास नियमावली पाठवली आहे. त्यामध्ये शहराचे नियोजन कसे करावे याबाबत मार्गदर्शन होते. त्यामध्ये स्पष्टपणे शहरी भागातील मॉल तसेच बाजारपेठ तसेच संकुल आदी बंद ठेवण्याचे आदेश आहेत. त्या नियमांना अधिन राहूनच जिल्हा प्रशासनाने सांगलीतील बाजारपेठेतील दुकाने उघडण्यास बंदी घातलेली आहे. सध्या उपनगरातील दुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. तसेच बाजारपेठेच्या परिसरातील सोडून अन्यत्र असलेल्या मद्य विक्री करणाऱ्या दुकानांना देखील परवानगी देण्यात आलेली आहे. यामध्ये जिल्हा प्रशासनाने स्वत:चे कोणतेही अधिकार वापरलेले नाहीत. आपल्या शेजारच्या जिल्ह्यात प्रामुख्याने सोलापूर आणि सातारा येथे कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. परिणामी ते जिल्हे रेड झोनमध्ये गेलेले आहेत. आपला जिल्हा ऑरेज झोनमध्ये असला तरी आपण सर्वांनीच आवश्यक ती खबरदारी घेतली पाहिजे.'
ते म्हणाले, व्यापारी बांधवांची बाजारपेठ सुरु करण्याची मागणी आहे. याबाबत लोकप्रतिनिधी , पालकमंत्र्यांशी फोनवरुन चर्चा झालेली आहे. त्याच प्रश्नावर रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सकारात्मक तोडगा निघेल, अशी आशा आहे. सध्या ज्या ठिकाणी दुकाने सुरु आहेत तेथे सोशल डिस्टन्सचे पालन होते का, याचीही पाहणी करण्यात येत आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून कार्यरत राहणे गरजेचे आहे. बाजारपेठ सुरु करायची असेल व्यापारी बांधवांनी देखील जबाबदारी घेतली पाहिजे.'
आम्हाला शब्दांचा खेळ करायचा नाही
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, शासन निर्देशानुसारच प्रमुख बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. कोणतेही अतिरिक्त नियम सांगलीकरांना लागू केलेले नाहीत. मुख्य म्हणजे जिल्हा प्रशासनाला शब्दांचे कोणतेही खेळ करायचे नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, आणि जिल्हा ऑरेज झोनमधून ग्रीन झोनमध्ये जावा यासाठीच आमचा प्रयत्न आहे.
दुकानांसाठी वेळेचे बंधन नाही
डॉ. चौधरी म्हणाले, शासन नियमावलीनुसार प्रमुख बाजारपेठ बंद असली तरी उपनगरातील दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. त्यांना तासांचे बंधन घातलेले नाही. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या कालावधीत ते आपापली दुकाने उघडी ठेवू शकतात. केवळ सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे गरजेचे आहे. मंडई तसेच आठवडा बाजार सध्या बंदच ठेवण्यात येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.