व्यापाऱ्यांनो, आदेश पाळा, अन्यथा कारवाई करू

Traders, obey orders, otherwise we will take action
Traders, obey orders, otherwise we will take action
Updated on

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनबाबत राज्य शासनाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करीत आहे. व्यवसाय सुरू करण्याबाबत व्यापाऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या शासनाकडे पोहोचवल्या जातील. मात्र व्यापाऱ्यांनी शासनाचे आदेश पाळावेत, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिला. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले,""कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने 30 एप्रिलपर्यंत व्यापार बंदचे आदेश दिले आहेत. सातत्याने व्यापार बंदमुळे आर्थिक फटका बसत असून व्यापाऱ्यांना शिथिलता देण्याच्या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी जिल्हाधिकारी व महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली होती. मात्र प्रशासनाने शिथिलता देण्यास असमर्थता दर्शवली. व्यापार बंद केल्यास आर्थिक हानी होणार आहे. 

गतवर्षी लॉकडाऊनच्या कालावधील व्यापार बंद राहिला. त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले होते. बॅंकांचे हप्ते, कर्जासह व्याजाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आमची भूमिका ही व्यवसाय कोणत्याही परिस्थितीत सुरू ठेवण्याची मागणी आहे, व्यवसाय सुरू करण्याबाबतच्या व्यापाऱ्यांच्या जे म्हणणे आहे, ते शासनाकडे पोहोचवले जाईल. कोरोनाचा संसर्ग रोखण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. सरकारकडून त्या प्रतिबंध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लॉकडाऊनबाबतचे आदेश राज्य सरकारचे आहेत, त्यात कोणताही बदल किंवा शिथिलता देण्याचे कसलाही अधिकार जिल्हा प्रशासनास नसल्याचे स्पष्ट केले. नियमाबाबत बुधवारपासून कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com