Sangli-Tasgaon Road Accident : कुमठे फाट्यावर भीषण अपघात; माय-लेकरं ठार दुचाकी-जीपची धडक; पती गंभीर जखमी; दुचाकीचा चक्काचूर

Sangli-Tasgaon Road Accident : सांगली-तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा परिसरात दुचाकी आणि जीपची धडक होऊन एका महिलेसह तिच्या दोन मुलांचा मृत्यू झाला. पती गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
Sangli-Tasgaon Road Accident
Sangli-Tasgaon Road Accident sakal
Updated on

सांगली : येथील सांगली-तासगाव रस्त्यावरील कुमठे फाटा परिसरातील वळण रस्त्यावर दुचाकी आणि प्रवसी वाहतूक करणाऱ्या जीपची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मातेसह तिचं दोन चिमुकली लेकरं जागीच ठार झाली. तर पती गंभीर जखमी झाले असून शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी सव्वादहाच्या सुमारास हा अपघात झाला. काळीज पिळवटणाऱ्या या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com