सोलापूर मार्गावर 'या' रेल्वे आठवडाभरासाठी रद्द

संतोष भिसे
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

मिरज - सोलापूर ते वाडी या रेल्वे सेक्शन दरम्यान इंटरलाॅकींग आणि दुहेरीकरणासंदर्भातील कामे केली जाणार आहेत, त्यामुळे मिरज ते सोलापूर मार्गावरील काही गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या पुर्ण प्रवास करणार नाहीत. सोलापूर विभागातून ही माहीती देण्यात आली.

वडशिंगे ते भाळवणी यादरम्यानच्या 35 किलोमीटर अंतरातील पाच स्थानकांत कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मिरज-परळी पॅसेंजर 17 ते 23 आॅगस्ट या कालावधीत धावणार नाही. मिरज - सोलापूर सुपरफास्ट एक्सप्रेस 18 ते 23 आॅगस्ट दरम्यान बंद राहील. मिरज - कुर्डूवाडी डेमू लोकल 16 ते 24 आॅगस्ट या कालावधीत मोडलिंबपर्यंतच जाईल व तेथून मिरजेला परत फिरेल. कोल्हापूर -नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेस 18 ते 22 आॅगस्टदरम्यान रद्द केली आहे. कोल्हापूर-बीदर साप्ताहिक एक्सप्रेस 21 आॅगस्टरोजी रद्द आहे. 

महापुरामुळे गेले आठवडाभर विस्कळीत झालेली कोल्हापूर - पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प आहे, त्यातच आता सोलापूर मार्गाचीही भर पडली आहे. आगामी आठवडा बहुतांश सुट्ट्यांचा आहे. या कालावधीत रेल्वेला प्रवाशांची गर्दी होते. या गर्दीच्या हंगामातच रेल्वे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. सोलापूर विभागात सुमारे सत्तरहून अधिक एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्या रद्द केल्या आहेत किंवा त्यांचे प्रवासी अंतर कमी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This train on Solapur route canceled for the week