Atpadi Politics : स्वाभिमानामुळेच जनतेने दिली संधी;तृतीयपंथी दिलीप हेगडे यांची भावना, प्रभारी सरपंच झाले पंचायत समिती सदस्य

Transgender Leader : सांगली जिल्ह्यातील आवळाई गावातून राजकारणात प्रवेश करून स्वाभिमानाच्या बळावर लोकांचा विश्वास संपादन करणारे दिलीप हेगडे आता पंचायत समिती सदस्य झाले आहेत. उपसरपंच ते प्रभारी सरपंच असा प्रवास करत त्यांनी विठलापूर गणातून ७ हजारांहून अधिक मते मिळवत दमदार विजय मिळवला.
Atpadi Panchayat

Atpadi Panchayat

sakal

Updated on

सांगली : ‘‘राजकारणात मी स्वाभिमानामुळे आलो. प्रेमापोटी आणि स्वाभिमानामुळेच जनतेने सेवेची संधी दिली. निवडणुकीतील संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न राहील,’’ अशी भावना आवळाई (ता. आटपाडी) गावच्या उपसरपंच, प्रभारी सरपंच ते आता पंचायत समिती सदस्यापर्यंत मजल मारलेल्या तृतीयपंथी दिलीप हेगडे यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com