ज्याचा माल त्याचाच हमाल; वाहतूकदारांचा निर्धार, उद्यापासून आंदोलन

जयसिंग कुंभार
Wednesday, 15 July 2020

राज्यातील वाहतूकदार उद्यापासून "ज्याचा माल त्याचा हमाल' आंदोलन करणार आहेत.

सांगली : राज्यातील वाहतूकदार उद्यापासून "ज्याचा माल त्याचा हमाल' आंदोलन करणार आहेत. त्यानुसार यापुढे वाहतूक खर्चातील वाराईची संपुर्ण जबाबदारी वाहतूकदार घेणार नाहीत अशी माहिती वाहतुकदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कलशेट्टी यांनी दिली. 

कलशेट्टी म्हणाले,"" वाहतूक भाड्यात वाराईचा वाटा 17 ते 18 टक्के इतका असतो. स्थानिक माल वाहतुकीमध्ये तो अगदी 30 ते 31 टक्के इतका असतो. वाराचे काम जवळजवळ 90 टक्के बिगर माथाडी हमालच करीत असतात. माथाडी कायद्याची अंमलबजावणीसाठी शासनाने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकात (6 सप्टेंबर 2016 रोजीचे) वाराई नावाची कोणतीही प्रक्रिया नोंदीत नाही.

वाराई ही भरणी उतरणीच्या रकमेमध्ये समाविष्ठ होऊन व्यापारी, उद्योजक, गोदाम चालक, मालक अशा आस्थापनांनीच धनादेश अथवा आरटीजीएसने देण्याची स्पष्ट तरतूद आहे. यापलीकडे जर कोणी अशी वसुली करीत असेल तर पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्टपणे म्हटले आहे. याबाबत राज्यभरात संघटनेने मालवाहतूकदार, जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, व्यापारी संघटना, उद्योजक, गोदाम चालक, हमाल संघटनांसोबत गेल्या चर्चा, प्रबोधन सुरु आहे.

त्यानंतर आता सर्व वाहतूकदार यापुढे ज्याचा माल, त्याचा हमाल ही बूमिका घेऊनच भाडे निश्‍चिती करतील. यापिढे भरणी-उतरणीवेळी वाराई, मुन्शियाना, टपाल आदी कोणताही खर्च भाड्यामधून वसूल करायचा नाही हे भाडे पावतीवर व्यापारी,उद्योजक, गोदाम चालक, मालक यांच्याकडून नमूद करुन घेतले जाईल. म्हणजेच भाडे ""साफी'' नक्की करून टपालावर लिहून घेतले जाईल. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The transporters in the state will start agitation from tomorrow onwards