
इस्लामपूर : येथील तहसीलदार कार्यालयासमोरील रिक्षा थांब्याजवळील झाड अचानक पडल्याने दोन रिक्षा व एका दुचाकीचे नुकसान झाले. आठवडा बाजार असल्याने ग्राहकांची धांदल उडाली. शेतकरी, भाजीपाला मालाची मांडणी करीत असताना जोराचा आवाज झाल्याने सर्वांनी जीवाच्या आकांताने पळ काढला. त्यामुळे अनर्थ टळला.