थरथराट ः अरं...गावात  आली "टकलू हैवानाची गॅंग'

hqdefault (1).jpg
hqdefault (1).jpg
Updated on

पेड (सांगली) : कोरोनामुळे "लॉकडाउन'मध्ये केशकर्तनालये बंद झाल्याचा फटका लहान मुले व प्रोढ व्यक्तींनी चांगला बसला आहे. दररोज "सेल्फी' काढून "डीपी'ही ठेवता येईना. सर्वांच्याच डोक्‍यावर केसांचे जणू डालगे तयार झाले. यावर चांगला उपाय काढत लहान मुलांपासून ते प्रोढ व्यक्तींनी घरच्या घरी केस कापण्याच्या इलेक्‍ट्रिक मशीनच्या साह्याने डोक्‍याचा टक्कल करत घरातच "टकलू हैवानाची गॅंग' तयार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे "थरथराट' या मराठी चित्रपटाची आठवण अनेकांना होऊन गेली. 

सांगली जिल्ह्यातील ग्रामिण भागात अशी "टकलू हैवानाची गॅंग' सर्रास पहावयास मिळत आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण किती मिळाले ? याबरोबर आज किती नवीन टकले झाले, यावरही "व्हॉट्‌सऍप'च्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येऊ लागले. सर्व पार्लर्स व सलून बंद असल्याने गनिमी काव्याने मागच्या दाराने, खिडकीतून, गच्चीवरून अशी इलेक्‍ट्रिक मशीनची देवाणघेवाण सुरू झाली. बघता बघता हा आकडा कोरोनाइतक्‍याच वेगाने वाढत चाललेला आहे.

कोणी "फॅशन' म्हणून तर कोणी नाईलाजास्तव टक्कल करताना दिसून येत आहेत. दर वर्षी यावेळी शाळेच्या परीक्षा संपून सुट्या सुरू होण्याचे दिवस. शाळेला सुटी लागली, की इतरवेळी शाळेत गुंतलेली वानरसेना चौफेर उधळत पालकांच्या नाकीनऊ आणते. ही वानरसेना घरात "क्वारंटाइन' झाली आणि पालकांचे "बीपी' वाढायला सुरुवात झाली. दोन ते चार दिवस गेल्यावर मुलांनी घरातच आपल्या उपद्रवक्षमतेला वाव दिला आणि पालकांचे जीव कासावीस व्हायला लागले. शाळा आणि बाहेर खेळण्यासाठी असणारी मैदाने यांचे महत्त्व एकाएकी कमालीचे वाढले.

दिवस जातील तसे मुलांचे उपद्रवमूल्यही वाढू लागले आणि त्यांनी चार भिंतीच्या आतून ऑनलाइन करामती सुरू केल्या. हे आधुनिक "टकलू हैवान' आजही नवनवीन करामती करून पालकांना मेटाकुटीस आणत आहेत आणि टकलू हैवानाची टोळी गावात दाखल झाल्याच्या घटनेला पुन्हा नवीन रीतीने उजाळा मिळत आहे आणि पालकांचा अंगाचा पुन्हा एकदा थरथराट होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com