VIDEO : मंत्री थोरातांच्या कन्येचा आदिवासी डान्स व्हायरल

TRIBAL DANCE OF THE DAUGHER OF MINISTER THORAT
TRIBAL DANCE OF THE DAUGHER OF MINISTER THORAT

अकोले - महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डाॅ. जयश्री यांनी उडदावणे तालुका अकोले या गावातील महिलांबरोबर होळी सण साजरी केली. 

यावेळी त्यांच्या मैत्रणी या कार्यक्रमात सहभागी झाल्या. आदिवासी महिलांनी आदिवासी फुगडी नृत्य सादर करून त्यांच्यामध्ये डाॅ. जयश्री थोरात यांनी फुगडीबरोबर नृत्य केले. त्यांचे प्रश्न जाणून घेत महिलांना साडी व लुगडे फडकी वाटप करण्यात आले. महसूल मंत्री बाळसाहेब थोरात यांच्या कनिष्ठ कन्या जयश्री या कॅन्सर तज्ज्ञ आहेत. सध्या कॅन्सर हॉस्पिटल मुंबई येथे कार्यरत आहेत. आणि एकविरा फौंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व राज्याच्या विविध आदिवासी भागात काम करतात.

त्या आहेत कॅन्सर तज्ज्ञ

नाशिक जिल्ह्यातील कौठदरा येथील एसएमबीटीमध्येही त्यांचे रिसर्च व संशोधन सुरु आहे. कँसर तज्ज्ञ म्हणून त्या दिवसातून सात ते आठ ऑपरेशन करतात.  त्यांना सामाजिक कामाची आवड असल्याने मैत्रिणी डॉ. कल्याणी गुंजाळ, प्राध्यापक वृषाली साबळे  यांच्यासोबत त्या. उडदावणे या आदिवासी पाड्यात पोहचल्या.

तत्पूर्वी त्यांनी विविध पक्षांचे आवाज काढणारे स्वर्गीय ठकाबाबा गांगड यांचे चिरंजीव सखाराम गांगड, बुधाजी गांगड यांना निरोप पाठवून आपण भेटायला येत असल्याचे सांगितले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास डॉ. जयश्री आपल्या मैत्रणीसमवेत तिथे पोहचल्या.

आदिवासी संस्कृतीची माहिती

पाड्यातील महिलांनी आपल्या अंगावर नवीन फडकी ,साडी बाजूबंद घालून त्यांचे स्वागत केले. गावातील महिलांच्या त्यांच्यासोबत ओळखी झाल्या. सखाराम गांगड यांनी आपल्या आदिवासी भागाची त्यांना माहिती दिली. येथील पारंपरिक संस्कृती, सण, उत्सवाची माहिती दिली. त्यानंतर रंगले आदिवासी नृत्य.

कोंबडी नाच, जात्यावरची गाणी

महिलांनी फुगडी, कोंबड नाच, जात्यावरच्या गाणी, देव देवतांची गाणी, होळीची गाणी सादर केली. यावेळी डॉ. जयश्री व त्यांच्या मैत्रिणींनी त्यांच्यात सहभागी होऊन त्याच्या फुगडी नृत्यावर ताल धरला. चार तास त्यांनी आदिवासी महिलांसोबत एकरूप होण्याचा प्रयत्न केला.

पाण्याचं तेवढं बघा

सर्व महिलांनी एकत्र येऊन स्नेहभोजन केले. मग गप्पांचा फडही रंगला. आरोग्याबाबत आदिवासी महिलांना डॉ. जयश्री यांनी मार्गदर्शन केले. उडदवणे गावाला दरवर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. 5 किलोमीटरवरून पाणी आणावे लागते. त्यासाठी नवीन पाणी योजना करून सरकारने निधी द्यावा, अशी आपुलकीची मागणी त्या महिलांनी केली. 

त्या म्हणाल्या मी पुन्हा येईन

आदिवासी महिलांनी फडकी घालून त्यांचा आपुलकीने सत्कार केला. डॉक्टर जयश्री यांनाही आदिवासी आदरातिथ्य भावले. त्यावर त्या म्हणाल्या. मी पुन्हा पुन्हा येईल...असा शब्द देऊन त्या पुन्हा संगमनेरकडे रवाना झाल्या. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com