
मोहोळ : चालत्या मालट्रकच्या बॅटरी मध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत मालट्रक जळून खाक झाली. ही घटना सोमवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील शेटफळ ता मोहोळ शिवारात डोंगरे वस्ती जवळ घडली. यात कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात झाली आहे. दरम्यान रविवार ता 5 रोजी मोहोळ बस स्थानकात एका एसटी बस ने पेट घेतला होता तर सलग दुसऱ्याच दिवशी सोमवारी एका मालट्रक ने पेट घेतल्याची घटना घडली आहे.