भुईंजनजीक महामार्गावर ट्रक उलटला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑक्टोबर 2019

येथे रात्री तीनच्या सुमारास मुंबईहून बंगलोरला कागद घेवून जाणारा मालट्रक भुईंजनजीक उलटला.

भुईंज (ता. वाई) : येथे रात्री तीनच्या सुमारास मुंबईहून बंगलोरला कागद घेवून जाणारा मालट्रक भुईंजनजीक उलटला. यामध्ये ट्रकमधील चालक किरकोळ जखमी झाला असून, त्यास सातारा येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. क्लिनरला कोणतीही दुखापत झाली नाही.

या घटनेमुळे अपघात स्थळावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, भुईंज पोलिस ठाण्याचे हवालदार मेजर कोळपे यांनी वाहतूक सेवारस्त्याने वळवून सुरळीत केली. हा अवजड ट्रक दोन क्रेनलाही उचलत नसल्याने सकाळी नऊपर्यंत ताे रस्त्यावरून बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरू हाेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The truck overturned on the highway