उमदी : उमदी (ता. जत) येथे मंगळवेढ्याहून येणाऱ्या ट्रकची धडक बसून जतकडे उपचारांसाठी नेत असताना एका महिलेचा मृत्यू झाला. विमल रामचंद्र सूर्यवंशी (वय ६२, उमदी, ता. जत) असे मृत महिलेचे नाव असून आज रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद झालेली नव्हती.