Tufted Duck : युरोपचा बदक घेतोय सांगलीकरांचा पाहुणचार

Sangli News : सांगलीत पहिल्यांदा दाखल; हजारो किलोमीटरचा प्रवास; बनेवाडी तलावात कॅमेराबद्ध
Tufted Duck
Tufted DuckSakal
Updated on

सांगली : युरोप आणि दक्षिण आशियातून हजारो किलोमीटरचं अंतर कापत शेंडी बदक (Tufted Duck) हा पक्षी सांगलीत पहिल्यांदाच दाखल झाला आहे. हिवाळ्यात पुणे, साताऱ्यात त्याचे वास्तव्य आढळेतच, मात्र यंदा सांगलीकरांचा पाहुणचार शेंडी बदकाने घेतला आहे. वैविध्यपूर्ण पक्ष्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या सांगलीत आणखी एका स्थलांतरित सुंदर पक्ष्याची भर पडली आहे. बनेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील तलावात पक्षी निरीक्षक प्रज्योत हंचनाळे यांनी या पक्ष्याला निरीक्षणावेळी कॅमेराबद्ध केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com