Tuljabhavani Temple: दिवाळीनिमित्त तुळजाभवानी मातेस अभ्यंगस्नान

Tuljabhavani Temple, Abhyang Snan : नरकचतुर्दशीनिमित्त तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेस पहाटे अभ्यंगस्नान घालण्यात आले. सुगंधी द्रव्ये, उटणे, इत्र आणि केशरयुक्त गरम पाण्याने धार्मिक विधी पार पडले. रात्री पारंपरिक भेंडोळी उत्सवही उत्साहात साजरा करण्यात आला.
Traditional Abhyang Snan and Bhendoli rituals are performed at Tuljabhavani Temple in Tuljapur.

Traditional Abhyang Snan and Bhendoli rituals are performed at Tuljabhavani Temple in Tuljapur.

esakal

Updated on: 

तुळजापूर, : तुळजाभवानी मातेस नरकचतुर्दशी निमित्त अभ्यंगस्नान रविवारी (ता. आठ) पहाटे तीनच्या सुमारास घालण्यात आले.नरकचतुर्दशीला तुळजाभवानी मातेचे चरणतीर्थ झाले. त्यानंतर चारला पूजेची घाट झाली. निर्माल्य विसर्जन झाले. भाविकांनी तसेच मंदिर संस्थानने आणलेले सुगंधी द्रव्य उटणे, सुगंधी तेल, इत्र (अत्तर), गुलाबजल यासह विविध वस्तूंनी अभ्यंगस्नान तसेच केशरयुक्त शतोदक (गरम पाणी) तुळजाभवानी मातेस घालण्यात आले. अभिषेक, धूपारती झाली. फराळाचा नैवेद्य दाखविण्यात आला.

Loading content, please wait...